महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी संपर्क; विरोधकांचा छळ करण्यासाठी केंद्र सरकारकडून ED चा वापर होत असल्याच्या आरोपाचं Sanjay Raut यांच्याकडून राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना खळबळजनक पत्र
महिन्याभरापूर्वी काही लोक महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मदत करावी यासाठी आपल्याकडे काही जण आले होते. मध्यावधी निवडणुका व्हाव्यात यासाठी त्यांचा प्रयत्न केल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे.
शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू (VP M Venkaiah Naidu) यांनी पत्र लिहित विरोधकांचा छळ करण्यासाठी सरकारकडून सक्तवसुली संचलनालयाचा (ईडी) वापर केला जात असल्याचा आरोप केला आहे. सोबतच महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी दबाव असल्याचंही सांगितलं आहे. राज्यात मध्यावधी निवडणूका व्हाव्यात यासाठी काहींनी त्यांची भेट घेतल्याचा खळबळजनक आरोप देखील करण्यात आला आहे. या प्रयत्नांना नकार दिल्याने धमकी येत असल्याचं, परिणामी राज्यसभेमध्ये मोकळेपणे बोलू नये असा आरोपही त्यांनी केला आहे.
संजय राऊत यांच्या कुटुंबामधून सुरूवातीला त्यांच्या पत्नीला ईडीने नोटिस धाडली होती त्यानंतर मागील काही दिवसांपूर्वी त्यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांच्यावरही कारवाई केली आहे. या कारवाईचा आधार घेत संजय राऊतांनी पत्र लिहले आहे. महिन्याभरापूर्वी काही लोक महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मदत करावी यासाठी आपल्याकडे काही जण आले होते. मध्यावधी निवडणुका व्हाव्यात यासाठी त्यांचा प्रयत्न केल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. मात्र आपण त्यांना अपेक्षित मदत केली नसल्याने कारवाई सुरु असल्याचा आरोप संजय राऊत यांनी पत्रामध्ये केला आहे. नक्की वाचा: Sanjay Raut On Varsha Raut ED Notice: ईडी नोटीस हे भाजपाचं वैफल्य, वर्षा राऊत यांना नोटीस ही 10 वर्षांपूर्वीच्या व्यवहाराची: संजय राऊत.
सत्यमेव जयते.. pic.twitter.com/ImdX7wPuYa
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 8, 2022
दरम्यान संजय राऊतांच्या पत्रामध्ये कॅबिनेटमधील दोन वरिष्ठ मंत्री आणि अन्य दोन मंत्र्यांनाही पीएमएलए अंतर्गत जेलमध्ये टाकणार आहोत अशी धमकी देण्यात आल्याचा राऊतांचा दावा आहे. महत्वाचे नेते जेलमध्ये गेले की राज्यात मध्यावधी निवडणुकांचा मार्ग मोकळा होईल असं राऊतांनी पत्रात लिहलं आहे.
ज्या पीएमएलए कायद्यांतर्गत ईडी कारवाई करत आहे, तो कायदा 2003 चा आहे. असं असूनही त्याआधीची प्रकरणंही बाहेर काढली जात असून हे योग्य नाही असं संजय राऊतांचं मत आहे. मुलीच्या लग्नाच्या खर्चासंबंधी चौकशी केली जात असल्याचंही संजय राऊतांनी सांगितलं आहे.
(The above story first appeared on LatestLY on Feb 09, 2022 10:02 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

