Vaibhav Sooryavanshi Bowling Video: 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची फिरकीची जादू; एकाच षटकात टिपल्या दोन महत्त्वाच्या विकेट्स
दुलीप ट्रॉफी २०२६ च्या उपांत्यपूर्व फेरीत ईस्ट झोनकडून खेळणाऱ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आपल्या फिरकी गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेत एकाच षटकात दोन बळी मिळवले.
आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला १५ वर्षांचा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी याने आता आपल्या फिरकी गोलंदाजीनेही क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. बंगळुरू येथे नॉर्थ ईस्ट झोनविरुद्ध पार पडलेल्या दुलीप ट्रॉफी २०२६ च्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ईस्ट झोनचे प्रतिनिधित्व करताना वैभवने अवघ्या चार चेंडूंच्या अंतरात दोन महत्त्वाच्या फलंदाजांना तंबूत धाडले. फलंदाजीत मोठी खेळी करण्यात अपयशी ठरल्यानंतर त्याने गोलंदाजीत ही चमकदार कामगिरी करून दाखवली.
Vaibhav Sooryavanshi provides Double Delight ✌️
Picks up 2⃣ wickets in the over. 2 excellent catches as well. 🙌
North East Zone are 79/7 in the 2nd innings after following on.
Scorecard ▶️ https://t.co/XJFhfvvTIU#DuleepTrophy pic.twitter.com/NnYbBPnrja
— BCCI Domestic (@BCCIdomestic) August 25, 2026
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 25, 2026 02:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

