MHADA Pune Lottery 2026: पुण्यात म्हाडाची 4462 घरांसाठी सोडत; अर्ज भरण्याची शेवटची तारीख, नियम आणि संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या
एकूण ४,४६२ घरांपैकी १,४९१ घरे १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत, तर २,९७१ घरे २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत उपलब्ध आहेत.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA) च्या पुणे मंडळातर्फे ४,४६२ घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. या घरांसाठी सोमवारपासून नोंदणी, अर्ज विक्री आणि स्वीकृती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजना आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत ही घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
एकूण ४,४६२ घरांपैकी १,४९१ घरे १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत, तर २,९७१ घरे २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत उपलब्ध आहेत. खाजगी विकासकांच्या प्रकल्पांमधील २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत म्हाडामार्फत परवडणारी घरे खरेदी करण्याची ही शेवटची संधी मानली जात आहे; कारण यापुढे या योजनेतील घरांचे वाटप थेट महानगरपालिकांमार्फत केले जाणार आहे.
महत्त्वाच्या तारखा आणि वेळापत्रक:
ऑनलाइन अनामत रक्कम भरण्याची अंतिम तारीख: १५ सप्टेंबर (रात्री ११:५९ वाजेपर्यंत)
RTGS/NEFT द्वारे अनामत रक्कम भरण्याची मुदत: १६ सप्टेंबरपर्यंत
प्रारूप अर्जांची यादी प्रसिद्धी: २९ सप्टेंबर (संध्याकाळी ७:०० वाजता)
अंतिम पात्र यादी प्रसिद्धी: ८ ऑक्टोबर (संध्याकाळी ७:०० वाजता)
सोडतीचा (लॉटरी) दिवस: १३ ऑक्टोबर (सकाळी ११:०० वाजता)
घरांचे ठिकाण, किंमत आणि नियमावली याविषयीची सविस्तर माहिती म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 24, 2026 10:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

