यंदा संपूर्ण देशभरात परतीच्या पावसाने चांगलाच हाहाकार माजविला आहे. यामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली असून नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यात शेतीचे अतोनात नुकसान झाल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत हा पाऊस लवकरात लवकर कमी होवो अशी अनेक लोक प्रार्थना करत आहे. मात्र आता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार (IMD), महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात परतीच्या पावसाचा मुक्काम आणखीन वाढण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे 10 ऑक्टोबरपर्यंत परतीच्या पावसाचा जोर कमी होतो. मात्र यंदा हा पाऊस 21 ऑक्टोबरपर्यंत लांबण्याची शक्यता आहे.
आधीच अतिवृष्टीमुळे मोठा आर्थिक फटका बसलेल्या शेतक-यांची चिंता आता आणखीन वाढण्याची शक्यता आहे. त्यात जर दिवाळीत हा पावसाचा जोर कायम राहिला तर ऐन सणासुदीच्या काळात लोकांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. पुणे जनता वसाहतीत मुसळधार पावसामुळे फुटली पाण्याची पाईपलाईन, 8 जण जखमी तर दोघांना गंभीर दुखापत
आज (18 ऑक्टोबर) कोणत्या मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता (RMC नुसार )
मुंबई- सर्वसाधारण ते मध्यम स्वरूपाचा पाऊस
ठाणे- सर्वसाधारण ते मध्यम स्वरूपाचा पाऊस
धुळे- मध्यम ते मुसळधार पाऊस
पुणे- मध्यम ते मुसळधार पाऊस
रत्नागिरी- सर्वसाधारण ते मध्यम स्वरूपाचा पाऊस
नाशिक- मध्यम ते मुसळधार पाऊस
औरंगाबाद- मध्यम ते मुसळधार पाऊस
सिंधुदुर्ग- सर्वसाधारण ते मध्यम स्वरूपाचा पाऊस
कोल्हापूर- सर्वसाधारण ते मध्यम स्वरूपाचा पाऊस
पुढील 3-4 मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात पावसाचा हा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण मुंबईत परतीचा पाऊस एक आठवडा लांबणार असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान आपली योग्य ती काळजी घेऊन घराबाहेर पडावे असेही सांगण्यात आले आहे.