पुण्यात मागील 2 दिवसांपासून पावसाचे थैमान सुरुच आहे. यात काल (16 ऑक्टोबर) ला झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या मुसळधार पावसामुळे पुणे जनता वसाहतीतील (Pune Janata Vasahat) पाण्याची पाईपलाईन फुटल्याने (Water Pipeline Break) येथील अनेक रहिवासी पाण्यात वाहून गेले. ही 18 इंचाची पाईपलाईन फुटल्याने अनेक घरात पाणी शिरले. या दुर्घटनेत 8 जण गंभीर जखमी झाले असून त्यातील दोघे जण गंभीर आहेत. जनता वसाहत गल्ली क्रमांक 29 मध्ये हा प्रकार घडला.
ही एवढी मोठी दुर्घटना होण्याचे कारण म्हणजे ही वसाहत डोंगर उतारावर वसलेली आहे. त्यामुळे पर्वतीच्या टेकडीवरून येणा-या पाण्याला चांगलाच प्रेशर असतो. त्यामुळे ही पाईपलाईन फुटल्याने पाणी वेगाने येथील रहिवाशांच्या घरात घुसले. यामुळे 8 जणांना दुखापत झाली असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. Pune Rains Update: पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस, शरद पवार यांची बारामती तुडूंब, अनेक घरांत पाणी शिरले, इंदापूरात 40 जणांचे प्राण वाचवले
Maharashtra: Eight injured, out of which two suffered serious wounds, due to a water pipeline burst in Pune's Janta Vasahat, last night as it flooded surrounding areas.
— ANI (@ANI) October 17, 2020
पुण्यातील मुसळधार पावसामुळे अनेक गावे बेचिराख झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर पाहून खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग मुठा नदीपात्रास सुरु करण्यात आला आहे. पाणी पातळी अचानक वाढण्याची शक्यता गृहित धरुन नदीकाटच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. तसेच नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर पडू नये आणि योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.
मुसळधार पावसामुळे पुण्यातील अनेक गावे पाण्याखाली गेली तर इंदापूरसह अनेक भागांत वॉटर लॉगिंगची समस्या निर्माण झाली. त्यातच पुणे जनता वसाहतीतील ही पाईपलाईन फुटल्याने येथील नागरिकांचे प्रचंड हाल झाले.