Ratnagiri Rain

राज्यातील विविध भागात पाऊस मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या काही तासात विविध भागात पूरसदृश्य (Flood) परिस्थिती निर्माण झाली असुन विविध गावांना पुराच्या पाण्याने विळखा घातला आहे. कोकण (Konkan), उत्तर महाराष्ट्र (Northen Maharashtra) , विदर्भासह (Vidarbha) पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) देखील जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील अनेक मोठ्या धरणांचे  दरवाजे उघडण्यात आले आहे. मुंबई (Mumbai), पुणे (Pune), साताऱ्यासह (Satar) कोकणात (Konkan) पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळत आहे. आता मुंबईत (Mumbai) पुढचे तीन तास मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे.  मुंबईत जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे.

 

हवामान तज्ज्ञ डॉ. कृष्णानंद होसाळीकर (Dr. Krishnanad Hosalikar) यांनी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट (Tweet) करत माहिती दिली आहे.  होसाळीकर यांच्या अंदाजानुसार मुंबई (Mumbai), सातारा (Satara) पुण्यासह (Pune) कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यांनी ट्विट करत सांगितलं आहे की, 'मुंबई, उपनगरात सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. ढगाळ आकाश आणि पश्चिम मध्य प्रणालीचा परिणाम म्हणजे उत्तर कोकण (Northen Konkan) बाजूच्या खालच्या पातळीवर पश्चिमेकडील भाग मजबूत होत आहे. या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.(हे ही वाचा:- Kirit Somaiya On Anil Parab: संजय राऊतांनंतर किरीट सोमय्यांच्या निशाण्यावर आता अनिल परब? अनिल परबांवर लवकरच मोठ्या कारवाईचे संकेत)

 

पश्चिम महाराष्ट्रासह (Western Maharashtra) कोकणात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नद्या तुडूंब भरुन वाहत असुन अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तरी नद्याकाठील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होणाऱ्या भागात एनडीआरएफच्या (NDRF) तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं असुन काही ठिकाणी शेती पिकांना देखील या पावसाचा फटका बसला आहे.