Rain | representative pic- (photo credit -pixabay)

Maharashtra Rain Update: राज्यभरात गेल्या दोन आढवड्यांपासून पावसाने थैमान घातले आहे. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रत, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस होत आहे. मुसळधार पावसाने नद्या, नाले दुथडी भरून वाहतात. गावातील झरे देखील भरून वाहतात.परिणामी, कोल्हापूर, वर्धा, हिंगोली, नांदेड रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर मान्सून पुन्हा एकदा महाराष्ट्रात सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत करून ठेवली आहे. पावसाने दोन दिवस विश्रांती घेतली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई, पुणे, कोकण आणि विदर्भात सातत्याने जोरदार पाऊस होत असला तरी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.  पुढील जोर कायम असल्याने एकीकडे गावातील शेतमाल खराब देखील झाला आहे. आता बळीराजाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.राज्यभरात पावसाने विश्रांती घेतली आहे. तर पुन्हा येणाऱ्या दोन दिवसांत पावसाचा जोर कायम असेल असा अंदार वर्तवला जात आहे.( हेही वाचा- हवामान विभागाचा अंदाज राज्यात पावसाची स्थिती)

मुसळधार पावसाने पंचगंगा, वशिष्ठी, पाताळगंगा, सावित्री, वर्धा आणि वैनगंगा नद्यांना पूर आला आहे. आज मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस असणार आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही यलो अलर्ट जारी करण्यात आला. त्याच बरोबर नागरिकांना सर्तक राहण्याचा इशारा दिला आहे. काल पावसाने विश्रांती घेतल्यानंतर येत्या दोन दिवसांसाठी पाऊस असणार आहे. मुंबईकरांना दोन आढवडे पावसानंतर काल पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे.