photo credit -x

भारतील हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात येत्या 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मुंबई, ठाणेसह कोकणात दिवसभर उकाडा जाणवला असला, तरी पुढील काही तासात पावसाची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पहायला मिळू शकतो. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 28 आणि 29 मे रोजी तुरळक ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून ही शक्यता वर्तवण्यात आली आहे. (हेही वाचा -  Maharashtra Weather Forecast For Tomorrow: उद्याचे हवामान कसे असणार? जाणून घ्या राज्यातील सध्याची स्थिती )

पाहा पोस्ट -

 

आयएमडीच्या अंदाजानुसार, कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे आहे. 29 मे रोजी कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचंही हवामान खात्याने सांगितलं आहे.

मुंबईत 10 जूनपासून मान्सूनचा पाऊस होईल अशी शक्यता आहे. मान्सून अंदमानमध्ये दाखल झाला असून तो 10 ते 11 जून दरम्यान मुंबईत पोहोचेल, असे या अहवालात नमूद करण्यात आलंय. साधारणपणे, मान्सून साधारणपणे 11 जून रोजी मुंबईत दाखल होतो, गेल्या वर्षी, चक्रीवादळ बिपरजॉयमुळे दोन आठवडे उशीर झाला होता.