पुणे: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्तीनंतर खासदार छत्रपती संभाजीराजे यांचे उपोषण मागे

पुणे (Pune) येथील छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) स्वायत्तता अबाधित ठेवावी, यांसह विविध मागण्यांसाठी खासदार छत्रपती संभाजी राजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आणि सारथीच्या विद्यार्थ्यांनी आगरकर रस्त्यावरच ठिय्या देत लक्षणिक उपोषण सुरू केले होते. यातच शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मध्यस्तीनंतर संभाजी राजे यांनी उपोषण मागे घेतले आहे. तसेच लवकरच अंदोलकांच्या मागण्या पूर्ण केल्या जातील, असे अश्वासनही एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. मराठी कुणबी सामाजाच्या विकासासाठी स्थापन केलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेबाबत विविध आदेश काढून संस्थेला बदनाम केले जात आहे, असा आरोपही छत्रपत्री संभाजी राजे यांनी केला होता.

मागील काही दिवसांपासून सारथी संस्थेबाबतीत अनेक वादविवाद समोर येत आहेत. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेवर (सारथी) लादलेल्या निर्बंधांविरोधात मराठा क्रांती मोर्चाने उपोषणास्त्र उगारले आहे. 'सारथी' संस्थेची व्यथा मांडण्यासाठी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या आगरकर रस्त्यावरील कार्यालयासमोर लक्षणिक उपोषण सुरू केले होते. खासदार संभाजीराजे छत्रपती, 'सारथी'चे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे हे देखील या उपोषणात सहभागी झाले होते. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी संभाजी राजे यांच्या उपोषण ठिकाणी धाव घेऊन त्यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा केली. तसेच लवकरच अंदोलनकर्त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जातील असे अश्वासनही एकनाथ शिंदे यांनी दिले. त्यानंतर संभाजी राजे यांनी आपले उपषोण मागे घेतले. हे देखील वाचा- 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर दिब्रिटो प्रकृती बिघडल्यामुळे मुंबईत परतले

मराठा-कुणबी समाजाच्या आर्थिक सामाजिक व शैक्षणिक सक्षमीकरणासाठी स्वायत्त अधिकार छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) स्थापना राज्य सरकारने केली होती. तसेच मराठा समाजासाठी आर्थिक आणि शैक्षणिक उन्नतीच्या विविध योजना राबण्यासाठी कंपनीला कायद्यानुसार अधिकार देण्यात आले होते. परंतु, मंत्रालयातील सरकारी अधिकाऱ्यांनी या संस्थेच्या अधिकारांना लगाम लावण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे या अंदोलन करण्यात आले होते. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्याभरातून शेकडो विद्यार्थी पुण्यात दाखल झाले होते.