आम्ही शिवसेना ( Shiv Sena) सोडली नाही. वेगळा गटही निर्माण केला नाही. केवळ गटनेता बदलला आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील शिवसेना खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल शेवाळे यांचा उल्लेख लोकसभेतील शिवसेना गटनेते असा केला. प्रत्यक्षात लोकसभा अध्यक्षांनी राहुल शेवाळे यांना गटनेता म्हणून मान्यता दिली आहे किंवा नाही याबातब माहिती मात्र पुढे येऊ शकली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद दिल्ली येथे पार पडली. या पत्रकार परिषदेत राहुल शेवाळे बोलत होते.
भाजपसोबत युती करण्यास शिवसेना पक्ष प्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही इच्छा होती. त्यांनी तशी तयारी केली होती. पंतप्रधान नरेद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात जुलै 2021 मध्ये चर्चाही झाली होती. पुढे मात्र या चर्चेनुसार काही घडू शकले नाही. पुढे त्यांनी विचार बदलला. मात्र, शिवसेना नेत्यांच्या बैठकीमध्ये जेव्हा भाजपसोबत युती करण्याचा मुद्दा आला तेव्हा शिवसेना खासदार आणि अनेक नेत्यांनी भाजपसोबत युती करण्याबातब भूमिका घेतली. तेव्हा मात्र मी युतीसाठी प्रयत्न केले. आता तुमच्याकडून काही होत असतील तर पाहा, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यानुसारच आम्ही आता युती करण्याचा निर्णय घेतल्याचेही राहुल शेवाळे म्हणाले.
ट्विट
Uddhav Thackeray was keen on realigning with BJP, but went back on his word: Rahul Shewale, new Shiv Sena leader in Lok Sabha
— Press Trust of India (@PTI_News) July 19, 2022
शिवसेना आजही एनडीएचाच भाग आहे. आजही आम्ही एनडीएतून बाहेर पडल्याचे पत्र आम्हाला मिळाले नाही. तसेच, शिवसेना युपीएमध्ये सहभागी झाल्याचे अधिकृतरित्या कोणी सांगितले नाही. तसे पत्रही मिळाले नाही, असे राहुल शेवाळे यांनी म्हटले. दरम्यान, आम्ही आजही शिवसेनेतच आहोत. आम्ही केवळ गटनेता बदलला असल्याचा पुनरुच्चार राहुल शेवाळे यांनी केला.भाजपसोबत युती करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला नाही. त्यामुळेच मार्ग वेगळे झाल्याचे राहुल शेवाळे म्हणाले. (हेही वाचा, Shiv Sena: राहुल शेवाळे लोकसभेतील शिवसेना गटनेते, भावना गवळी चिप व्हीप- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)
दरम्यान, राज्यातील शिवसेना-भाजप युती सरकारचे आमदार खासदार आणि जनतेतून प्रचंड स्वागत होत आहे. आमचा कोणताही वैयक्तीक अजेंडा नाही. केवळ जनतेच्या हितासाठीच आम्ही नवे सरकार बनविणयाचा निर्णय घेतला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ते दिल्ली येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना खासदार राहुल शेवाळे यांचा उल्लेश शिवसेना गटनेता असा केला.