Maharashtra Politics: माझी पात्रता नसेल म्हणून मला मंत्री पद दिलं नाही, पंकजा मुंडेंचा खोचक टोला
Pankaja Munde | (Photo Credit : Facebook)

सरकार स्थापन होवून तब्बल एक महिना उलटून गेल्यानंतर राज्याच्या मंत्री मंडळाचा (Maharashtra Cabinet Expansion) विस्तार झाला. आता मंत्रीमंडळाच्या खाते वाटपाचा मात्र अजूनही मुहूर्त लागेना. विरोधकांकडून यावर जोरदार टीका होताना दिसतेच. पण संबंधित मंत्री मंडळ विस्तारावर आपली प्रतिक्रीया देत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी देखील भाजपला घरचा अहेर दिला आहे. पत्रकारांशी बोलत असताना पंकजा मुंडे म्हणाल्या मंत्री पदाची माझी पात्रता नसेल म्हणून मला मंत्री पद दिलं नसेल असा खोचक टोला पंकजा मुंडे यांनी राज्यातील भाजप (BJP) नेतृत्वाला लगावला आहे. तसेच राज्याच्या मंत्री मंडळाचा विस्तारानंतर मंत्रीमंडळाच्या खाते वाटपावर देखील पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.

 

तर पंकजा मुंडे यांच्या या खोचक टिकेला उत्तर देणं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis)  यांनी टाळलं आहे. वर्ध्यातील (Wardha) सेवाग्राम आश्रमाला भेट दिल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी पंकजा मुंडे यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस यांनी "यावर बोलण्याची ही जागा आहे का," असं उत्तर देत त्यांनी पंकजा मुंडेच्या या प्रतिक्रीयेवर मौन बाळगलं आहे. पण नवनिर्वाचित मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan) यांनी मात्र यावर आपली प्रतिक्रीया नोंदवली आहे. पंकजा मुंडे यांची पक्षावर कुठल्याही प्रकारची नाराजी नाही आणी असेल तरही पक्षश्रेष्ठी त्यांची नाराजी नक्की दूर करतील, असं वक्तव्य गिरीष महाजन यांनी केलं आहे. (हे ही वाचा:- Maharashtra Rains: पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज तर राज्यातील विविध भागात जोरदार पावसाची हजेरी)

 

पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळेल किंवा नाही याबाबत मला शंका वाटत आहे. मात्र त्यांनी मंत्रिपद मिळण्यासाठी जास्त वाट न पाहता आपल्या वरिष्ठांना भेटावे. मंत्रिपदासाठी आपल्या त्यांना शुभेच्छा आहेत," असं एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले. पंकजा मुंडेंना पाठींबा दर्शवत एकनाथ खडसे यांनी ओबींसीचा मुद्दा पुढे करत भाजपवर निशाणा साधला आहे.