Eknath Shinde | (Photo Credits: Facebook)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सामिल झालेल्या शिवसेनेच्या (Shiv Sena) 16 बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत नोटीस (Notice of Disqualification) बजावण्यात आली आहे. शिवसेना पक्षाने विधानसभा उपाध्यक्षांकडे केलेल्या मागणीवरुन ही नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसनुसार संबंधित (16) आमदारांना नोटीस बजावल्यापासून पुढील 48 तासात आपले म्हणने मांडण्याबाबत आदेश देण्यात आले आहे. 48 तास म्हणजेच सोमवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत या आमदारांना आपले म्हणने मांडावे लागणार आहे. आमदारांनी निश्चित वेळेत बाजू मांडली नाही तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाणार आहे.

बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई झाली तर त्यांना शिवसेनेचे कवच सोडावे लागणार आहे. शिवसेनेने दिलेल्या 16 आमदारांवरील अपात्रतेच्या प्रस्तावावर विधिमंडळाचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि उच्च अधिकाऱ्यांची प्रदीर्घ काळ चर्चा झाली. त्यानंतर या आमदारांना नोटीस गेली आहे. (हेही वाचा, Shiv Sena Mouthpiece Saamana on BJP: शिवसेना मुखपत्रातून भाजपवर शरसंधान, 'भोग्यांना हाताशी धरून भाजप स्वतःला महाशक्ती म्हणून मिरवतेय')

बंडखोर आमदारांनी वेळेत आपले म्हणने मांडले नसेल तर विधिमंडळ कायद्यांतर्गत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ या आमदरांवर कारवाई करु शकतात. एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, बालाजी किन्नीकर, अनिल बाबर, भारत गोगावले, प्रकाश सुर्वे, महेश शिंदे, अब्दुल सत्तार, यामिनी जाधव, संदीपन भुबरे, संजय शिरसाठ, लता सोनवणे, अशी नोटीस बजावण्यात आलेल्या आमदारांची नावे असल्याची प्राथमिक माहिती आहे.