Maharashtra Police Bharti 2020: पोलीस दलात मेगाभरतीची संधी, लवकरच 8 हजार रिक्त पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : Facebook)

देशात वाढती बेरोजगारी पाहता राज्य सरकारकडून पोलीस दलात नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या मेगाभरतीसाठी गृह विभाग लवकरच जवळजवळ 8 हजार रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड करणार आहे. याबाबच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अधिक माहिती दिली आहे. पोलीस भरतीमुळे राज्यातील पोलिसांवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न केला जाण्याच्या उद्देशाने उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

राज्यात वाढते गुन्हे पाहता यावर जबर बसाला म्हणून रिक्त पदांवर नोकर भरती करण्यात येणार आहे. त्याचसोबत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे.

यापूर्वी मुंबई, नवी मुंबई, रायगड सह महाराष्ट्रातील 21 ठिकाणी पोलीस शिपाई चालक तर पुणे, नवी मुंबई,नागपूर SRPF च्या 10 ठिकाणी राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी नोकरभरतीची काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली होती.(राज्य कर निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक या पदांसाठी राज्यात 555 उमेदवारांची होणार भरती, पहा कुठे, कसा आणि कधी पर्यंत करू शकाल अर्ज?)

तर पोलीस भरतीसाठी आता शारीरिक चाचणी (मैदानी चाचणी) आधी लेखी परीक्षा होणार आहे. त्यामुळे जर का लेखी परीक्षा पास झालात तरच तुम्हाला मैदानी चाचणी देता येणार आहे. यावर्षी पोलीस भरतीच्या काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. याद्वारे आता मैदानी चाचणी ही 100 ऐवजी 50 गुणांची होणार आहे. लवकरच या नियमाचा जीआर काढला जाणार आहे. त्यानुसार अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी हे लेखी परीक्षेचे विषय आहेत. लेखी परीक्षेत खुल्या गटाला किमान 35 टक्के, राखीव गटासाठी 33 टक्के गुण मिळवणे आवश्‍यक आहे. त्यानंतर तुम्ही मैदानी चाचणी देऊ शकणार आहात.