Maharashtra Police | (File Photo)

महाराष्ट्रातील पोलीस भरतीबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महत्वाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती केली जाणार आहे. मात्र, येत्या 31 डिसेंबर पूर्वी 5 हजार 200 पदांची भरती कुठल्याही परिस्थितीत करणार आहेत. तसेच इतर 7 हजार रिक्त पदांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. दिलीप वळसे यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलात भरती होण्याची तयारी करत असलेल्या तरूणांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद येथे गृहमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी औरंगाबाद येथे पोलीस दलाच्या अनुषंगाने विविध मुद्यांवर त्यांनी भाष्य केले. महाराष्ट्र पोलीस दलात डिसेंबरपूर्वी 5200 जागांवर भरती केली जाईल. तसेच इतर उर्वरित 7 हजार पदांची भरतीबाबत लवकर निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- Raj Thackeray Congratulate Narayan Rane: नारायण राणे यांचा फोन रिचेबल होताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून शुभेच्छा

ट्वीट-

महत्वाचे म्हणजे, कोरोना संकटात आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांचेही त्यांनी कौतूक केले आहे. जर, कोरोनामुळे एखाद्या पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तर, त्यांच्या पाल्यांना नोकरी देण्याचे धोरण दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे