Ashish Shelar (Photo Credits: You Tube)

महाराष्ट्र सरकारच्या नव्या निर्णयानुसार यापुढे राज्यातील अशासकीय खाजगी शाळांमधील अर्धवेळ शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथपाल तसेच रात्र शाळेतील शिक्षाकांना सुद्धा सातवा वेतन आयोगाचा (7th Pay Commission)  लाभ होणार आहे. यासंदर्भात शिक्षण मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar)  यांनी माहिती दिली असून या सर्वांना सर्वांना 1  जानेवारी 2016 पासूनच्या पगारात सातवा वेतन आयोग लागू करणार असल्याचे सुद्धा सूचित केले आहे. यापूर्वी शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होत असताना शिक्षकांना बाजूला सरण्यावरून काही संघटनांनी आक्षेप घेतला होता. त्याबाबत शासनाने निर्णय घेत शासकीय कर्मचाऱ्यांबरोबरच शिक्षकांनाही वेतन आयोग लागू करण्यात येणार असल्याचे सांगितले होते, मात्र आता घेण्यातआलेल्य निर्णयानुसार केवलसरकारीच नव्हे तर अशासकीय खाजगी शाळांमधील शिक्षकांचाही विचार करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, सध्या राज्यात 1012 अर्धवेळ शिक्षक, 1431 अर्धवेळ ग्रंथपाल तसेच 165 रात्र शाळांमधे काम करणारे 630 रात्र शाळा शिक्षक व २१९ शिक्षकेत्तर कर्मचारी आहेत. सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णयावरून निश्चितच या हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे समजत आहे. प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू; 'या' शिक्षकांना मिळणार लाभ

 

पहा ट्विट

दरम्यान, राज्य सरकारच्या पूर्व बैठकीत, उच्च शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या विविध शिक्षण संस्थांमधील शिक्षक व शिक्षक समकक्ष संवर्गांना सातवा वेतन आयोग (Seventh Pay Commission) लागू करण्याचे निर्देश देण्यात आले होते.