मनसे (MNS) पदाधिकारी जमील शेख (Jameel Shaikh) यांची दिवसाढवळ्या भररस्त्यात गोळ्या घालून हत्या (Murder) करण्यात आली आहे. ही घटना ठाणे (Thane) जिल्ह्यातील राबोडी (Rabodi) परिसरात सोमवारी दुपारी घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. क्लस्टरच्या वादातून ही हत्या करण्यात आली आहे, असा आरोप ठाणे जिल्ह्याचे मनसेचे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे. याप्रकरणी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील हल्लेखोर पसार झाले असून त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जमील शेख हे घरी येत असताना दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांचा पाठलाग केला. बाइकवरून आलेल्या दोन जणांपैकी बाइकवर मागे बसलेल्या एकाने जमील यांच्यावर गोळी झाडली. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. दरम्यान, डोक्याला गोळी लागण्याने जमील खाली कोसळले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. जमील यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर त्यातून पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे येण्याची शक्यता आहे. हे देखील वाचा- आपला मुख्यमंत्री, आपले नशीब, आपले दुर्दैव, आपली जबाबदारी- मनसे नेते संदीप देशपांडे
Maharashtra Navnirman Sena leader Jameel Shaikh shot dead by unidentified persons in Thane, say police.
More details awaited
— ANI (@ANI) November 23, 2020
जमील शेख यांच्यावर 2017 मध्ये देखील हल्ला झाला होता. मात्र, अजूनही या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी अटक केली नसल्याचे अविनाश जाधव यांनी म्हटले आहे. जमील शेख यांचा ठाण्यात राबवण्यात येणार्या ’क्लस्टर’ योजनेला विरोध होता. त्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी केला आहे.