Maharashtra Nagar Panchayat Election Results | (Photo credit: Archived, edited, symbolic image )

Nagar Panchayat Election Result 2019 In Maharashtra: मित्रपक्ष शिवसेनेसोबत झालेल्या सत्तासंघर्षातून सत्तेबाहेर फेकले गेलेल्या भाजपला राज्यातील नगरपंचायत निवडणुकीतही मोठा धक्का बसला आहे. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात चंदगड नगरपंचात (Chandgad Nagar Panchayat) निवडणुकीत महाआघाडीने बाजी मारत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना धोबीपछाड दिला आहे. तर, हातकणंगले नगर पंचायत ( Hatkanangale Nagar Panchayat) निवडणुकीत शिवसेना भगवा फडणविण्यात यशस्वी झाली आहे. मात्र, इथे शिवसेनेला नगराध्यक्ष पदावर विजय मिळवता आला नाही. त्यामुळे हातकणंगलेत काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष बनला आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवूनही सत्तेपासून दूर बसावे लागल्याने भाजपमध्ये पक्षांदर्गत वाद सुरु असून, त्याचाच फटका नगरपंचात निवडणुकीत बसल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. विशेष म्हणजे महाविकासआघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आजच पार पडला. आजच्याच दिवशी महाविकासआघाडीला ग्रामिण भागातूनही सुवार्ता मिळाली आहे.

चंदगड नगरपरिषदेत महाविकासआघाडी विजयी

दरम्यान, गेली अनेक वर्षे चंदगड ग्रामपंचायत असलेल्या या ठिकाणी नगरपंचायत निवडणूक पहिल्यांदाच पार पडत आहे. त्यामुळे नगरपंचायतीवर कब्जा मिळविण्यासाठी इथे चुरशीची लडाई झाली. रविवारी पार पडलेल्या मतदानाची मतमोजणी सोमवारी पार पडली. या मतमोजणीनुसार प्राप्त झालेल्या निकालानुसार, महाविकासआघाडीच्या प्राची कानेकर नगराध्यक्ष झाल्या. प्राची कानेकर यांनी भाजपच्या समृद्धी कानेकर यांचा पराभव केला. चंदगड नगरपरीषदेत एकूण 15 जागांपैकी महाविकासआघाडी 10 तर भाजप 5 आणि 2 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले.

हातकणंगले नगरपपरिषद निवडणुकीत शिवसेना अव्वल पण नगराध्यक्ष काँग्रेसचा

हातकणंगले येथे 17 जागांसाठी निवडणुक पार पडली. या निवडणुकीत 7 जागा पटाकवत शिवसेना अव्वल राहीली. तर, त्याखालोखाल भाजप 5, राष्ट्रवदी काँग्रेस आणि काँग्रेस प्रत्येकी एक जागा मिळवली. तर 3 अपक्ष निवडूण आले. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे अरुण जानवेकर निवडणूक आले. या निवडणुकीत काँग्रेस-स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडी होती. तर शिवसेना-भाजप एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. (हेही वाचा, सावंतवाडी नगरपरिषद नगराध्यक्ष पद निवडणूक 2019: शिवसेना पराभूत; नारायण राणे समर्थक भाजप उमेदवार संजू परब विजयी)

यवतमाळ: धानकी नगरपपरिषद भाजप अव्वल नगराध्यक्ष पद भाजपकडे

यवतमाळ जिल्ह्यात धानकी नगरपरिषद (Dhanki Nagar Panchayat) निवडणुकीसाठी एकूण 17 जागांसाठी झालेल्या मतमोजणीत भाजप 5, राष्ट्रवादी काँग्रेस 4, राष्ट्रीय काँग्रेस 8, शिवसेना 2, अपक्ष 2 आणि इतर 2 उमेदवार विजयी झाली. इथे नगराध्यक्ष पद भाजपकडे राहिले.

राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस या प्रमुख पक्षांच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडी सरकार अस्तित्वात आले. मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या सरकारचे नेतृत्व करत आहेत. देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरलेल्या भाजपला सत्तेच्या परीघाबाहेर बसविण्यासाठी महाराष्ट्रात पहिल्यांता पाऊल टाकले गेले. या पावलाला महाविकासआघाडी असे नाव देण्यात आले. राज्य पातळीवर राबवलेला हा प्रयोग हळुहळू स्थानिक पातळीपर्यंतही राबवला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, भाजपला सत्तेबाहेर बसविण्यासाठी देशभरातही हा पर्याय वापरला जाण्याची शक्यता आहे.