Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

मुंबईत (Mumbai) अनेक भागात पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरीही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ सुरुच आहे. मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर (K S Hosalikar) यांनी दिलेल्या ताज्या अपडेट्नुसार, धुळे (Dhule), जळगाव (Jalgaon), हिंगोली (Hingoli), नंदुरबारसह (Nandurbar) सिंधुदुर्गात (Sindhudurg) पुढील 3 तासांत जोरदार पावसाची शक्यता (Maharashtra Monsoon Update 2020) वर्तविण्यात आली आहे. या दरम्यान जोरदार विजेच्या कडकडाटासह हा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यासोबत ढगांचा गडगडाट देखील होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. IMD ने दिलेल्या अंदाजानुसार, या भागात या भागात ढगाळ वातावरण दिसून येत आहे.

कोकणासह गोव्यातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी काळजी घ्यावी आणि गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. आज सुट्टीचा दिवस असल्या कारणाने नागरिकांनी समुद्र किनारी जाणे टाळावे असेही हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. दिलासादायक! मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा तलाव अखेर ओसंडून वाहू लागले; मुंबई महानगरपालिकेने दिली माहिती

दरम्यान यंदा महाराष्ट्रामध्ये सरासरीच्या 12% अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात यंदा सर्वदूर मुबलक पाऊस झाल्याने पाण्याची चिंता टळल्याची स्थिती आहे. यंदा ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस बरसला होता. त्यातुलनेत आता सप्टेंबर महिन्यात पावसाने उसंत घेतली आहे. मात्र आता यंदाच्या मान्सूनच्या शेवटाकडे जाणार्‍या पावसाळा ऋतूमध्ये पुन्हा येत्या काही तासांत तुरळक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या ही परिस्थिती महाराष्ट्रासोबतच देशाच्या इतर भागांमध्येही आहे.