Monsoon (Photo Credit: PTI/Representational Image)

मुंबईत (Mumbai) गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण असले तरीही पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. मात्र महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अपडेट्सनुसार, लातूर (Latur), परभणी (Parbhani), मराठवाडा (Marathwada) आणि अन्य जिल्ह्यात पुढील 3-4 दिवसात मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर (K S Hosalikar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून येत्या 2-3 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविणयात येत आहे.

दरम्यान अन्य भागात वातावरण ढगाळ राहिल. यामध्ये 17 सप्टेंंबर पासुन पावसाचा जोर आणखीन वाढेल असेही सांंगण्यात आले आहे. आयएमडीचे उपमहासंचालक के.एस. होसाळीकर (K.S. Hosalikar) यांंनी याविषयी ट्विटमधुन माहिती दिली आहे. प्राप्त माहितीनुसार, हवामान खात्याने 17 सप्टेंंबर पासुन कमी दाबाचा एक पट्टा निर्माण होईल आणि म्हणुन पावसाचा जोर वाढेल असे सांंगितले आहे. तर मुंंबई व कोकणात काही दिवस अगदी तुरळक पाऊस होईल असेही सांंगण्यात आले आहे.

हेदेखील वाचा- दिलासादायक! मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा तलाव अखेर ओसंडून वाहू लागले; मुंबई महानगरपालिकेने दिली माहिती

दरम्यान यंदा महाराष्ट्रामध्ये सरासरीच्या 12% अधिक पाऊस झाला आहे. मुबलक पाऊस झाल्याने पाण्याची चिंता टळल्याचे संकेत आहेत. यंदा ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस बरसला होता. त्या तुलनेत आता सप्टेंबर महिन्यात पावसाने उसंत घेतली आहे, तरी पावसाचे महिने संपेपर्यंत तुरळक पाऊस कायम राहिल असे अंदाज आहेत.