Monsoon In Maharashtra 2020 | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह काल (3 ऑक्टोबर) संध्याकाळपासून पावसाने चांगलाच जोर धरला. मेघगर्जना आणि ढगांच्या कडकडाटासह काल मुंबईत चांगला पाऊस बरसला. आज सकाळपर्यंत मुंबईतील अनेक भागांत पावसाची (Mumbai Rain) संततधार सुरु असून भांडूप (Bhandup), मुलूंड (Mulund) मध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. महाराष्ट्रातील कोकण (Konkan), मध्य महाराष्ट्रात (M.Maharashtra) देखील पावसाचा जोर कायम असून आजही या भागांमध्ये वादळी वा-यांसह पाऊस बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर (K S Hosalikar) यांनी दिली आहे. महाराष्ट्रामध्ये परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून 5 ऑक्टोबर दरम्यान मध्य महाराष्ट्र, कोकणातही काही भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज मुंबई वेधशाळेने (IMD) वर्तवला आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मागील 24 तासांत समाधानकारक पाऊस पडला. या परिसरात 79-100 मिमी इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे. IMD नुसार आजही अनेक भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. Monsoon Updates 2020: 28 सप्टेंबर पासून देशात परतीच्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता- IMD

महाराष्ट्रासह मुंबईत ऑगस्ट महिन्यापासून पावसाने चांगलाच जोर पकडला. त्यानंतर ऑगस्टच्या मध्यावर पावसाचा जोर कमी होऊन पुन्हा सप्टेंबरमध्ये पावसाने जोर धरला.

यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणा-या अनेक जलाशयांमध्ये समाधानकारक वाढ झाली असून दरवर्षीच्या तुलनेत यंदा चांगल्या पावसाची नोंद झाली. पाणीपुरवठा करणा-या तलाव पूर्णत: भरली असून मुंबईवरील पाणीकपातीचे संकट टळले.