BJP Protest At Vidhan Bhavan (Photo Credits: ANI)

Monsoon Session: महाराष्ट्र सरकारच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Monsoon Session Day 2)  दुसर्‍या दिवशी आज विरोधी पक्ष भाजप (BJP ) कडुन राज्य सरकार विरुद्ध विधानभवन परिसरात आंंदोलन पुकारण्यात आले आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट काळात महाराष्ट सरकार (Maharashtra Government) पुरेश्या उपाययोजना करत नसल्याचे मत भाजपकडुन मांंडण्यात आले आहे आणि त्याचाच धिक्कार करण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. यावेळी विधानभवनात जमलेल्या भाजप आमदारांंनी मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) व राज्य सरकार वर ताशेरे ओढत पोस्टर झळकावले होते. घरात बसुन रिमोटने सरकार चालवणार्‍या मुख्यमंंत्र्यांंचा धिक्कार असो, कोरोनाच्या महामारीत महाराष्ट्राला वार्‍यावर सोडणार्‍या ठाकरे सरकारचा धिक्कार असो, कोरोना हाय हाय ठाकरे सरकार बाय बाय अशा पाट्या झळकावत आंदोलनकर्त्यांनी घोषणा दिल्या होत्या.

महाराष्ट्रात कोरोना संक्रमित मृतांची संख्या 27 हजारांच्या पार; जाणून घ्या जिल्हानिहाय आकडेवारी

एकीकडे, कोरोनाच्या विरुद्ध महाराष्ट्र सरकारचा धिक्कार करत असताना दुसरीकडे स्वतः भाजप आमदारांंनी सुद्धा सोशल डिस्टंंसिंगचे नियम धाब्यावर बसवले आहेत. विधानभवन परिसरातुन समोर येणार्‍या फोटोंंमध्ये आपण हे पाहु शकता.

ANI ट्विट

दरम्यान, आज महाराष्ट्र पावसाळी अधिवेशनाचा दुसर्‍या दिवसाचे कामकाज सुरु झाले आहे. आज विधानपरिषदे मध्ये सुद्धा शिवसेना व भाजप उमेदवारांंपैकी विधान परिषद उपसभापतींंची निवड होणार आहे.