Coronavirus Update: महाराष्ट्रात कोरोना संक्रमित मृतांची संख्या 27 हजारांच्या पार; जाणून घ्या जिल्हानिहाय आकडेवारी
Coronavirus (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) विळखा अधिकाधिक घट्ट होत चालला असून यापासून आपल्या राज्याची सुटका करण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र राज्य आरोग्य मंत्रालयाने (Maharashtra Health Department) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात काल (7 सप्टेंबर) दिवसभरात 16,429 नवे कोरोना पॉझिटिव्ह (COVID-19 Positive) रुग्ण आढळले असून 423 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 9 लाख 23 हजार 641 वर (COVID-19 Cases) पोहोचली असून मृतांचा आकडा आकडा 27,027 (COVID-19 Death Cases) वर पोहोचला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.93% एवढा आहे.

राज्यात काल दिवसभरात 14,429 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. यामुळे आतापर्यंत कोरोनावर मात करणा-या रुग्णांची संख्या 6,59,322 वर (COVID-19 Recovered) पोहोचली आहे. यासह राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 71.38% एवढे झाले आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हा व मनपा निहाय आकडेवारी (7 सप्टेंबर रात्री 8: 00 वाजेपर्यंत)  

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई मनपा १५७४१० ७९००
ठाणे २१८७१ ५५२
ठाणे मनपा २८९८४ ९९८
नवी मुंबई मनपा ३१४४३ ६८९
कल्याण डोंबिवली मनपा ३५४१० ६८२
उल्हासनगर मनपा ८१८४ २९४
भिवंडी निजामपूर मनपा ४६५५ ३२०
मीरा भाईंदर १४३५३ ४५१
पालघर ९६२८ १६३
१० वसई विरार मनपा १८५५४ ४८१
११ रायगड २०७९१ ५३६
१२ पनवेल मनपा १४८१७ ३३३
ठाणे मंडळ एकूण ३६६१०० १३३९९
नाशिक ११३४१ २८३
नाशिक मनपा ३२१८४ ५६४
मालेगाव मनपा २८६७ ११९
अहमदनगर १४६७२ २०२
अहमदनगर मनपा १०२६६ १५३
धुळे ५०८१ १२४
धुळे मनपा ४४८४ ११३
जळगाव २४३१५ ७४९
जळगाव मनपा ७५५२ १८६
१० नंदुरबार ३३०५ ८५
नाशिक मंडळ एकूण ११६०६७ २५७८
पुणे ३३२५५ ८३२
पुणे मनपा ११५२४० २७८२
पिंप्री-चिंचवड मनपा ५४९७३ ८५६
सोलापूर १५९८६ ४१२
सोलापूर मनपा ७३२८ ४४३
सातारा १९०२२ ४३२
पुणे मंडळ एकुण २४५८०४ ५७५७
कोल्हापूर १९६४९ ५७९
कोल्हापूर मनपा ८५६९ २१७
सांगली ८८४१ २६४
सांगली मिरज कुपवाड मनपा १०३९२ २७७३०४
सिंधुदुर्ग १८६२ २४
रत्नागिरी ५१९५ १६७
कोल्हापूर मंडळ एकुण ५४५०८ १५५५
औरंगाबाद ९०२० १४०
औरंगाबाद मनप १६४५२ ५६३
जालना ५१६७ १५०
हिंगोली १८२० ४१
परभणी १७३७ ४७
परभणी मनपा १७१८ ५४
औरंगाबाद मंडळ एकूण ३५९१४ ९९५
लातूर ६०७० १९८
लातूर मनपा ४२०८ १२५
उस्मानाबाद ७४४१ २१४
बीड ५८२२ १५७
नांदेड ५३९५ १४२
नांदेड मनपा ४०८० १२४
लातूर मंडळ एकूण ३३०१६ ९६०
अकोला २०७२ ६७
अकोला मनपा २४४९ ९९
अमरावती १६४० ४५
अमवरावती मनपा ४४३८ १०१
यवतमाळ ४१५७ ९३
बुलढाणा ४२१६ ८९
वाशीम २१८३ ३६
अकोला मंडळ एकूण २११५५ ५३०
नागपूर ९२३७ १२३
नागपूर मनपा ३०२३४ ९२९
वर्धा १५६८ २३
भंडारा १८५५ २७
गोंदिया २३४२ २५
चंद्रपूर २३८७ २३
चंद्रपूर मनपा १५८७ १८
गडचिरोली ९६७
नागपूर मंडळ एकूण ५०१७७ ११६९
इतर राज्य ९०० ८४
एकूण ९२३६४१ २७०२७

राज्यात सर्वाधिक रुग्ण संख्या पुण्यात असून त्यापाठोपाठ मुंबईत कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आहेत. तर भारतात कोरोना बाधितांची एकूण आकडा 42 लाखांच्या पार गेला आहे. देशात एकूण 42,04,614 जणांना आतापर्यंत कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तर यामध्ये 8,82,542जणांवर देशभर उपचार सुरू आहेत. तर 32,50,429 जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशामध्ये कोरोना व्हायरसमुळे बळी गेलेल्यांची संख्या 71,642 आहे.