Maharashtra Monsoon: विदर्भासह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा, पुन्हा एकदा पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता
Ratnagiri Rain

विदर्भासह (Vidarbh) मराठवाड्यात (Marathwada) काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आपतकालीन भागात एनडीआरएफच्या (NDRF) तुकड्या दाखल करण्यात आल्या आहेत. विदर्भातील नागपूर (Nagpur), वर्धा (Wardha), चंद्रपूर (Chandrapur), यवतमाळसह (Yavatmal) अमरावती (Amravati) जिल्ह्यात  जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. तरी प्रशासनाकडून पुन्हा कदा पूर सदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच  मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही (North Maharashtra) मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भात या मुसळधार पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे.

 

विदर्भासह मराठवाड्यात झालेल्या आणि राज्यातील इतर विभागात ओला दुष्काळ (Wet Spell) जाहीर करण्यात यावा, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे सरकारकडे (Shinde Governement) केली आहे. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाश शिंदे (CM Eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांना पत्र देण्यात आले आहे. संबंधीत मागणीवर शिंदे सरकार काय निर्णन घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. तरी गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी विदर्भातील वर्धा जिल्ह्याचा दौरा केला. (हे ही वाचा:- Maharashtra Monsoon: राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून विदर्भासह कोकणाला विशेष सुचना)

 

गेले काही दिवसात पावसाने उसंत घेतली असली तरी वरुण राजा पुन्हा एकदा राज्यात दमदार हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्त देखील पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभुमिवर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाला हवामान विभागकडून विशेष सुचना देण्यात आल्या आहेत.