गेल्या 2-3 दिवसांपासून मुंबईत (Mumbai) धुव्वाधार पाऊस होत आहे. आज सकाळपासूनही पावसाचा जोर कायम आहे. यामुळे मुंबईतील अनेक भाग जलयम झाले आहेत. दरम्यान, पुढील 5 दिवस पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. मुंबईतसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचे असून मुंबईसाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर कोकणातील रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindugurg) या जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Mumbai Water Supply Update: मुसळधार पाऊस; जलमय मुंबईत पाणी पुरवठा खंडीत; भांडुप पंपिंग स्टेशन तुंबल्याने फटका)
मागील 24 तासांपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर येथे जोरदार पाऊस होत आहे. रात्रीच्या वेळेस काही भागांमध्ये 5-6 तास पावसाचा जोर कायम आहे. मुंबईत कुलाबा येथे 196.8mm, वांद्रे येथे 206.5mm, जुहू मध्ये 206mm, सांताक्रुझ मध्ये 234.9mm, महालक्ष्मी मध्ये 164mm, मीरारोडमध्ये 235mm, दहीसर 268mm, भाईंदर 203mm इतक्या पावसाची नोंद झाली आहे. नवी मुंबईतील बेलापूर येथे 201.2mm, नेरुळ मध्ये 197.2mm, वाशी येथे 193.9mm तर ऐरोली येथे 190.6mm पावसाची नोंद झाली आहे. ठाण्यात 180mm, शहापूरमध्ये 70mm, अंबरनाथ मध्ये 87mm, उल्हासनगरमध्ये 67mm, कल्याणमध्ये 66mm आणि पालघर 236.6mm पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती के. एस. घोसाळीकर यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
K S Hosalikar Tweet:
18 Jul
Rainfall Summary of Mumbai Thane NM, Palghar. pic.twitter.com/mPTbwAntU9
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 18, 2021
दरम्यान, मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुले चेंबर आणि विक्रोळी येथे भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत आणि जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.