मुसळधार पावसाने रविवारी (18 जुलै) रात्री मुंबईत (Torrential Rains in Mumbai) कहर केला. मध्यरात्री 12 ते साधारण 3 वाजेपर्यंत संततधार कोसळलेल्या पावासाने सखल भागात मुंबईत पाणी साचले. त्यातच भांडूप पंपिंग स्टेशनमध्ये (Bhandup Pumping Station) मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. त्याचा फटका मुंबईच्या पाणी पुरवठ्यास बसला. त्यामुळे पाणी साचलेल्या मुंबईत मुंबईकरांना पाणी नाही अशी स्थिती निर्माण झाले. मुंबईत खंडीत झालेल्या पाणीपुरवठ्यावरुन (Mumbai Water Supply Update) सोशल मीडियावरुनही अनेकांनी महापालिकेला प्रश्न विचारले. दरम्यान, संपूर्ण मुंबई शहराला जो पाणीपुरवठा केला जातो त्या सर्व धरणांतील पाण्याचे शुद्धीकरण भांडूप संकुलात केले जाते. भांडूप संकुलात शुद्ध झालेले हेच पाणी पुढे मुंबईच्या घराघरात पोहोचते. मात्र, भांडूप येथील पंपिंग स्टेशनमध्येच पाणी तुंबल्याने पाणीपुरवठा काही काळ स्थगित करण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार, मुंबई शहरात प्रतिदिन 3800 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. (हेही वाचा, Mumbai Rains: मुंबईत 3 मोठ्या दुर्घटना; चेंबूर, विक्रोळी आणि भांडुप येथे भिंत कोसळून एकूण 15 जणांचा बळी)
कोणत्या ठिकाणी किती पाऊस?
मुंबई शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला. विभागवार पावसाची नोंद पाहता सांताक्रूज - 217.5 मिमीस, कुलाबा - 178 मिमी,महालक्ष्मी - 154.5 मिमी, वांद्रे - 202 मिमी, जुहू विमानतळ - 197.5 मिमी, राम मंदिर - 171.5 मिमी, मीरा रोड - 204 मिमी, दहिसर - 149.5 मिमी, भायंदर - 174.5 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली.
ट्विट
🌟🌟🌟🌟🌟
All water supply of H west ward ( entire mumbai) has been suspended till further notice.
This is due to power failure at Master Control Centre (MCC)
Water supply to H west shall be restored after further instructions in this matter.
🌟🌟🌟🌟🌟
— Hetal Gala - हेतल गाला (@Hetalgalabjp) July 18, 2021
लेटेस्टलीचे पत्रकार अब्दुल कादीर शेख यांनी ट्विटरवरुन स्थानिक नगरसेवक आणि महापालिकेला टॅग करत मुंबईतील खंडीत पाणीपुरवठ्याबाबत विचारले. यावर स्थानिक नगरसेवक हेतल गाला यांना माहिती देता सांगितले की, 'मुसळधार पावसामुळे तात्रिक कारणामुळे परिसरातील विजपुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे एच पश्चिम वॉर्ड आणि संपूर्ण मुंबईचाच पाणीपुरवठा काही काळासाठी खंडीत झाला आहे. समस्या निवारणासाठी प्रयत्न सुरु आहेत. लवकरच उपाययोजना करुन पाणीपुरवठा पूर्वपत केला जाईल'.