Maharashtra Monsoon 2020 Forecast: येत्या 3-4 तासांत नाशिक, औरंगाबाद, जळगाव सह काही भागात वीजांचा कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता:  IMD
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Pixabay)

मुंबई मधून पाऊस गडप झाला असला तरीही आज पुढील 3-4 तासामध्ये जळगाव, औरंगाबाद, नाशिक शहरामध्ये वीजांच्या कडकडाटासह पाऊस बरसण्याची शक्यता आहे. सोबतच जोरदार वारे देखील वाहतील असा अंदाज वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान विदर्भासह बीड, परभणी, हिंगोली आणि सोलापूर जिल्ह्यंमध्येही नागरिकांनी सतर्क रहावं असं आवाहन मुंबई हवामान खात्याचे Dy Director General of Meteorology के एस होसाळीकर (K S Hosalikar) यांनी ट्वीटरच्या माध्यमातून केले आहे. नागरिकांनी वीजांच्या कडकडाटांपासून सुरक्षित रहावं. तसेच दामिनी अ‍ॅपचा वापर करण्याचाही त्यांनी सल्ला दिला आहे.

महाराष्ट्रात यंदा 10 जूनला मान्सूनचं आगमन झालं आहे. त्यानंतर काही दिवसांतच त्याने सारं राज्य व्यापलं आहे. दरम्यान मुंबई शहरात जुलै महिन्याच्या सरासरीचा पाऊस बरसला आहे. परंतू अद्याप तलावक्षेत्रात पाणीसाठी मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे.

K S Hosalikar ट्वीट

Maharashtra Monsoon Update : मुंबई सह उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस;कोकणात सरी बरसणार  - Watch Video 

महाराष्ट्रात ग्रामीण भागामध्ये सध्या शेतीचा मोसम आहे. विदर्भात सोयाबीनचे पीक घेतले जात आहे. अशा काळात मुसळधार कोसळणारा पाऊस हा बळीराजाला सुखावणारा आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसह सामान्यांनाही पावसाची उत्सुकता आहे परंतू अनेक ठिकाणी पाऊस कमी वेळात धुव्वाधार पडल्यास योग्यप्रकारे पाणी निचरा न झाल्याने ते साचून राहिल्याने पूर सदृश्य स्थिती निर्माण झाल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत.