Maharashtra Monsoon 2019 Updates: मुंबई शहर उपनगरात सखल भागात पाणी साचले, अपघाताच्या घटना, कोकण विभागात अतिवृष्टीचा इशारा
Mumbai Rain Update (Photo Credits: Twitter/ ANI)

Maharashtra Monsoon 2019: परतलेल्या पावसाने मुंबई शहर (Mumbai City) आणि उपनगरात बुधवारी (24 जुलै 2019) मध्यरात्रीपासून दमदार हजेरी लावली. मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या पावसामुळे भल्या पहाटे उठून कामाला लागणाऱ्या मुंबईकरांची चांगलीच धांदल उडाली. या पावसामुळे शहरात काही ठिकाणी सखल भागात पाणी साचले तर काही ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या. सायन-माटुंगा या रेल्वे मार्गावर अधिक पणी साचल्या ने दादर ते कुर्ला रेल्वे वागतूक मंदावली. तर अधेंरी येथे पावसामुळे रस्त्यावर अपघात झाला. पावसामुळे रस्ता अंधूक झाल्याने हा अपघात घडला. जाणून घ्या कोणत्या ठिकाणी किती पाऊस.

दरम्यान, वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार सांताक्रूझमध्ये ५८ मिमी, तर कुलाबामध्ये १७१ मिमी इतक्या पावासाची नोंद झाली. प्राप्त माहितीनुसार, नवी मुंबई, ठाणे, दादर, सायन, कुर्ला, माटुंगा, अंधेरी, हिंदमाता आणि लालबाग आदी ठिकाणी पावसाची संततधार अद्यापही सुरु आहे.

राज्यभरात कसा आहे पाऊस?

पावसासाठी राज्यभरात पोषक स्थिती आहे. त्यामुळे राज्यातील विविध ठिकाणी पाऊस दमदार हजेरी लावताना दिसत आहे. असे असले तरी राज्याच्या काही ठिकाणी अद्यापही पावसाने म्हणावी तशी हजेरीच लावली नाही. त्यामुळे त्या ठिकाणी बळीराजा आकाशाकडे डोळे लाऊन बसला आहे. खास करुन सांगली जिल्ह्यातील आटपाडी, खानापूर, जत तर, साताऱ्यात मान वैगेरे तालुक्यांत अद्याप म्हणावा तसा पाऊस नाही. (अधिक माहितीसाठी हे ही पाहा, LIVE Maharashtra Monsoon 2019 Live Updates: अंधेरी परिसरात कार धडकेत 8 जण जखमी, पावसामुळे धुसर झालेल्या वातावरणामुळे 3 गाड्यांची धडक)

दरम्यान, हवामान विभागाने म्हटले आहे की, कोकण विभआगात 24 आणि 25 जुलै रोजी अतिवृष्टी होईल. तर मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसाची हजेरी दिसेन. मराठवाडा विदर्भातही येत्या चार दिवसात पाऊस दमदार हजेरी लावण्याची शक्यात हवामान विभागने वर्तवली आहे.