31 July Maharashtra Monsoon Forecast: मागील आठवड्यापासून मुंबईसह महाराष्ट्रामध्ये पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्रात सतत कोसळणार्या या पावसामुळे अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पुणे, मुंबईतील अनेक धरणं ओव्हरफ्लो झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आता अजून आठवडाभर मुंबईसह महाराष्ट्रामध्ये पाऊस बरसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज 31 जुलै दिवशी पावसाचा जोर मुंबईमध्ये ओसरणार आहे. असा अंदाज स्कायमेट या हवामान संस्थेने वर्तवला आहे. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील पाच धरणांमधील अतिरिक्त पाणी सोडले.
भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबईमध्ये वीजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच आज वार्याचा वेग सुमारे 30-40 kmph असून ठाणे, पालघर, रायगड भागात पुढील 4 तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
स्कायमेटचा अंदाज
हवामान अंदाज 31 जुलै: मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस, मुंबईत मध्यम सरी#MumbaiRain#Maharashtra#weatherforecasthttps://t.co/n29f0RxcTN
— Skymet Marathi (@SkymetMarathi) July 30, 2019
स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज मुंबईमध्ये जोर ओसरणार आहे. मध्य महाराष्ट्रामध्येही मध्यम आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसणार असल्याची शक्यता आहे. तर मुंबईमध्ये या आठवड्यातही पाऊस दमदार हजेरी लावणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्रामध्ये काल (30 जुलै) गोदावरी नदी धोक्याची पातळी पार करून वाहत असल्याने नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. पुण्यातही खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने भिडे पूलावरील वाहतूक थांबवण्यात आली होती.