Railways | Representational Image | (Photo Credits: ANI)

मागील काही दिवसात राज्यभर झालेल्या दमदार पावसाचा मोठा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. जुलै आणि ऑगस्टमध्ये रेल्वे रुळावर पाणी साचल्याने रेल्वेला अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या होत्या. प्रवाशांना देखील याचा मोठा त्रास सहन करावा लागला होता, मात्र यामध्ये त्यांना निदान आर्थिक बाजूने तरी दिलासा मिळावा याकरिता रेल्वेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार उपनगरीय रेल्वेतील प्रवाशांना रेल्वेने तिकिटांचे 13 कोटी रुपये परत केल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे. यापैकी मध्य रेल्वेने (Central Railway)  36. 7 लाख प्रवाशांना तिकिटाचे पैसे परत केले आहेत. मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता लोकलमध्ये मिळणार Free Wi-Fi

प्राप्त माहितीनुसार, पावसामुळे जुलैमध्ये 6 हजार 322 तर ऑगस्टमध्ये 2  हजार 689 उपनगरीय सेवा बंद करण्यात आल्या होत्या. जुलैमध्ये लांब पल्ल्याच्या गाड्या 348 तर ऑगस्टमध्ये 575 सेवा रद्द कराव्या लागल्या होत्या. सोबतच मुंबई-पुणे रेल्वेमार्ग 3  ऑगस्ट ते 15 ऑगस्ट बंद ठेवण्यात आला आहे. काही प्रसंगी उपनगरीय आणि लांब पल्ल्याची सेवा जवळपास 16 ते 20 तास बंद ठेवण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. रेल्वे प्रवासाचा अनुभव द्विगुणित करण्यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावरील या 6 एक्सप्रेसमध्ये सुरु झाली 'शॉपिंग ऑन व्हील' सेवा

दरम्यान, पावसाचा जोर आता ओसरत असल्याने रेल्वे पुन्हा पूर्वपदावर येऊ लागली आहे मात्र अद्याप मुंबई पुणे मार्गावर वाहतूक सुरु झालेली नाही.