Maharashtra MLC Governor’s Quota:  राज्यपाल कोठ्यातून शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षांच्या 'या' चेहऱ्यांना मिळू शकते विधानपरिषदेवर संधी
Maha Vikas Aghadi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)Chhatrapati

Maharashtra MLC Election 2020: राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवर पाठविण्यात येणाऱ्या राज्यपाल कोठ्यातील ( Maharashtra MLC Governor Quota) 12 सदस्यांची निवड लवकरच केली जाणार आहे. त्यासाठी सत्ताधारी महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस (Congress) या तिन पक्षांमध्ये खलबतं सुरु आहेत. दरम्यान, हे तिनही पक्ष प्रत्येकी चार जागा वाटून घेऊन आपले उमेदवार विधानपरिषदेवर पाठविण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष कोणत्या चेहऱ्यांना संधी देणार याबातब उत्सुकता आहे. दरम्यान, राज्यपाल कोठ्यातून विधानपरीषदेवर पाठविण्यासाठी काही चेहऱ्यांची नावे जोरदार चर्चेत आहेत. ती खालील प्रमाणे.

काँग्रेसमधून युवक काँग्रेसच्या सत्यजित तांबे यांच्या नावाची चर्चा

राज्यपाल कोट्यातून काँग्रेस पक्षाकडून विधानपरीषदेवर जाण्यासाठी सत्यजित तांबे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. सत्यजित तांबे हे युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. तसेच ते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. उल्लेखनिय असे की, सत्यजित तांबे यांचे वडील डॉ. सुधीर तांबे हेसुद्धा विधानपरिषदेवर आहेत. दरम्यान, सत्यजित तांबे यांच्यासोबतच नसीम खान, रजनी पाटील आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत या तिन अशा मिळून एकूण चार चेहऱ्यांच्या जोरदार चर्चा आहे. (हेही वाचा, Maharashtra MLC Election 2020: विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त सदस्य निवडीसाठी महाविकासआघाडी सरकारमध्ये आज चर्चा?)

राष्ट्रवादीच्या गोटातून एकनाथ खडसे?

काँग्रेस पक्षासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानपरिषदेवर पाठविण्यासाठी काही नावांची चर्चा सुरु आहे.या नावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांपेक्षा मित्रपक्षांच्या नावांची चर्चा अधिक मोठ्या प्रमाणावर आहे. यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, गायक आनंद शिंदे आणि उत्तमराव जानकर यांच्या नावाची चर्चा आहे. दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षात नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांच्या नावाचीही चर्चा आहे. नाराज असलेले एकनाथ खडसे भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकाटावर विधानपरिषदेवर जातील अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (हेही वाचा, Maharashtra MLC Election 2020: विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त सदस्य निवडीसाठी महाविकासआघाडी सरकारमध्ये आज चर्चा?)

दरम्यान, शिवसेना पक्षाकडून कोणाला संधी दिली जातेय याबाबत उत्सुकता आहे. शिवसेना आपल्या शिवसैनिकांना संधी देणार की मित्रपक्षांना संधी देत सोशल इंजिनियरींग राबवणार याबाबत उत्सुकता आहे.