Maharashtra MLC Election Result 2021: विधान परिषद निवडणूक निकाल; नागपूर, अकोला येथून भाजपची बाजी, महाविकासआघाडीला धक्का, चंद्रशेखर बावनकुळे, वसंत खंडेलवाल विजयी
BJP | (File Image)

महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी (Maharashtra MLC Election Result 2021) एकून सहापैकी दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. एकूण सहापैकी चार जागा बिनविरोध निवडल्या गेल्या. नागपूर (Nagpur) आणि अकोला वाशिम बुलडाणा (Akola Washim Buldana) जासांसाठी निवडणूक लागली. या दोन्ही ठिकाणी भाजप उमेदवारांनी बाजी मारली आहे. नागपूर येथून चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) तर अकोला येथून वसंत खंडेलवाल (Vasant Khandelwal) विजयी झाले. नागपूर येथे ऐनवेळी उमेदवार बदलाचा फटका काँग्रेसला बसला तर अकोला येथून शिवसेना आणि महाविकास आघाडीला आवश्यक मते मिळवता आली नाहीत.

अकोला येथे शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoria) आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत झाली. यात वसंत खंडेलवाल यांनी बाजी मारली. शिवसेनेच्या बाजोरिया यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. (हेही वाचा, Maharashtra MLC Election Result 2021: महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक निकाल, महाविकासआघाडी की भाजप? कोण मारणार बाजी? आज फैसला)

अकोला-वाशिम-बुलडाणा निकाल

भाजप- वसंत खंडेलवाल- 438 मते

शिवसेना- गोपिकिशन बाजोरिया- 328 मते

अकोल्यात भाजप किंवा महाविकासआघाडी (शिवसेना) अशा दोन्ही उमेदवारांकडे पुरेसे बहुमत नव्हते. त्यामळे हा सामना रंगणार हे निश्चित होते. अखेरच्या क्षणी भाजपने बाजी मारली.

नागपूर येथून भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांचा दणदणीत विजय झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून झालेल्या निवडणुकीत बावनकुळे यांचा विजय निश्चित मानला जात होता. बावनकुळे यांना भाजप आणि भाजपच्या मित्रपक्षांसोबतच महाविकासआगाडीचीही काही मते मिळाल्याचे पुढे येत आहे. महाविकासआघाडीची मते फुटल्यामुळे भाजपचे पारडे या ठिकाणी जड झाले. महाविकास आघाडीची जवळपास 16 मते फुटली अशी प्राथमिक माहिती आहे.

नागपूर विधानपरिषद निवडणूक निकाल

भाजप- चंद्रशेखर बावनकुळे- 362 मते

अपक्ष- मंगेश देशमुख- 186 मते (काँग्रेस पुरस्कृत)

काँग्रेस- छोटू भोयर- ०1 मत (काँग्रेसने ऐनवेळी उमेदवार बदलला होता.)

नागपूर मतदारसंघातून महाविकासआघाडी आणि भाजप अशा दोन्ही बाजूंच्या उमेदवाराकडे स्पष्ट बहुमत नव्हते. त्यामुळे दोन्ही उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर असणार हे नक्की. दुसऱ्या बाजूला अकोला,वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातही दोन्ही बाजूला तुल्यबळ लढत होती. मात्र, काँग्रेसने ऐन वेळी आपला उमेदवार बदलला. त्यामुळे या ठिकाणी मतदार कोणाच्या पारड्यात वज टाकतो याबाबत उत्सुकता आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल अशी आशा आहे.