महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांची मदत घेत सरकार स्थापन केले. मात्र हे सरकार फक्त 80 तासाचमध्ये कोसळल्याचे दिसून आले. कारण भाजपला बहुमताचा आकडा पार न करता आल्याने प्रथम अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. या सर्व राजकीयन नाट्यानंतर नव्या सरकाराच्या सत्ता स्थापनेसाठी हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपच्या कालिदास कोळंबकर यांची निवड करण्यात आली.
मंगळवारी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानुसार आज महाविकास आघाडी सत्ता स्थापन करणार आहे. या पार्श्वभुमीवर राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन आयोजित केले आहे. यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री आणि अन्य सर्व आमदरांच्या शपथविधीला सुरुवात झाली आहे. तर प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकासआघाडीकडून महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तसेच उपमुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात शपथ घेणार आहेत.उद्धव ठाकरे यांचा ग्रँन्ड शपथविधी सोहळा 28 नोव्हेंबर रोजी शिवतीर्थावर पार पडणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार यांनी पहिल्यापासूनच मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते.(Maharashtra Government Formation Live News Updates: विधानसभेचं एक दिवसीय विशेष अधिवेशन; आमदारांच्या शपथविधीला सुरूवात)
सत्तास्थापनेच्या शर्यतीमधून भाजप पक्ष आता बाहेर पडला आहे.भाजपने तोडफोडीचे राजकारण केले याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली गेली होती. त्यावर निकाल देताना उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करावे असे आदेश कोर्टाने दिले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.