उद्धव ठाकरे यांच्या शपथ विधीला 400 शेतकर्यांच्या कुटुंबीयांना आमंत्रण देण्यात आलं आहे. उद्या शिवाजी पार्कवर हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
Maharashtra Government Formation Live News Updates: उद्धव ठाकरे यांच्या शपथ विधीला 400 शेतकर्यांच्या कुटुंबीयांना आमंत्रण
Maharashtra MLAs Oath Ceremony: सर्वोच्च न्यायालायाने काल महाविकसआघाडीच्या तातडीच्या बहुमत चाचणी घेण्याच्या याचिकेवर सुनावणी करताना देवेंद्र फडणवीस सरकारला 30 तासांमध्ये बहुमत सिद्ध करावं लागणार होतं. त्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींचा वेग वाढला. त्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सत्ता स्थापनाचा मार्ग मोकळा झाला आहे. आज महाराष्ट्र विधानसभाचं एकदिवसीय अधिवेशन घेण्यात आलं आहे. काल संध्याकाळी कालिदास कोळंबकर यांना हंगामी अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलं. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे होणार महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री; जाणून घ्या 'मातोश्री' ते 'वर्षा'पर्यंतचा त्यांचा प्रवास.
आज कालिदास कोळंबकर यांच्याकडून 287 नव निर्वाचित विधानसभा आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. दरम्यान उद्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यासाठी शिवाजी पार्कावर जय्यत तयारी करण्यात आली आहे.
राज्यातील पक्षीय बलाबल पाहता भाजप (BJP) – 105, शिवसेना (Shiv Sena) – 56, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) – 54, काँग्रेस(Congress) – 44, बहुजन विकास आघाडी – 03, प्रहार जनशक्ती – 02, एमआयएम – 02, समाजवादी पक्ष – 02, मनसे – 01, माकप – 01, जनसुराज्य शक्ती – 01, क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01, शेकाप – 01, रासप – 01, स्वाभिमानी – 01, अपक्ष – 13 जागांवर विजयी झाले आहेत