COVID19: आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ वरळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर Containment Zone म्हणून घोषित
Worli Containment Zone (Photo Credits.: ANI)

कोरोना व्हायरसची (Coronavirus)  लागण झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीनुसार मुंबईतील काही भाग हे कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत, यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा बंगला मातोश्री (Mathoshree) येथील कलानगर (Kalanagar) परिसर ते सर्वाधिक दाटीवाटीचा धारावी (Dharavi) परिसर हे भाग सुद्धा समाविष्ट आहेत. आता महाराष्ट्र कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा मतदारसंघ वरळी (Worli) सुद्धा Containment Zone म्हणून घोषित करण्यात आला आहे. याठिकाणी आता संचारबंदीचे कडक नियम लागू करण्यात आले आहेत.ठिकठिकाणी पोलिसांचा पहारा वाढवण्यात आला असून नागरिकांना घरात राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. याठिकाणी अन्य नागरिकांची सुद्धा कोरोना चाचणी करण्यात येणार आहे त्यासाठी मुंबई महापालिकेकडू स्क्रिनिंग करणारी टीम रुजू करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन ही टीम अधिकाधिक नागरिकांची चाचणी घेणार आहे. (हेही वाचा - Coronavirus Outbreak In India: भारतात गेल्या 24 तासात 905 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण तर 51 जणांचा मृत्यू; देशातील कोरोना बाधितांची संख्या 9352 वर पोहोचली)

प्राप्त माहितीनुसार, मुंबईतील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे वरळी येथून आढळले आहेत, मागील काही दिवसात वरळी मधील 246 कोरोना प्रकरणात मोठी वाढ होऊन आज घडीला या ठिकाणी  280 कोरोना रुग्ण असल्याचे समजतेय. मुंबईतील 1399 कोरोना प्रकरणापैकी 20 टक्के रुग्ण हे वरळी भागातून असल्याचे दिसून आले आहे. याच पार्श्वभूमीवर आता वरळी कोळीवाडा , बीडीडी चाळ, जिजामाता नगर हे परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत, याबाबात स्वतः रहिवाशांनीच काही दिवसांपूर्वी मागणी केली होती.

ANI ट्विट

दरम्यान, देशभरात वाढत्या कोरोनाच्या प्रकरणांच्या आकडेवारीत महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. सद्य घडीला राज्यात 2334 कोरोना रुग्ण समोर आले असून यापैकी 229 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहेत.