राज्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी महाविकासाआघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 10 हजार कोटी रुपयांची मदत ( Rs 10,000 Crore Package) करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक आज (13 ऑक्टोबर) पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ही घोषणा केली. राज्य मंत्रिमंडळाच्याआजच्या बैठकीकडे राज्यभरातील शेतकरी आणि अतिवृष्टी तसेच पूरग्रस्तांच्या नजरा लागल्या होत्या. आजच्या बैठकीत
राज्यात जून ते ऑक्टोबर 2021 या काळात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी महापूर आला. या सर्वात शेतकऱ्यांचे सुमारे 55 लाख हेक्टरपेक्षाही अधिक शेतपीकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने मोठी मदत करावी आशी राज्यातील तमाम शेतकऱ्यांची आशा होती. दरम्यान, राज्य सरकारने केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली येणाऱ्या एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता राज्य सरकार मदत करत असल्याचे सांगितले. (हेही वाचा, Sindhudurg Chipi Airport Inauguration: खोटं बोलणाऱ्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी हकलून काढलं; नारायण राणे यांच्या समोर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा टोला)
राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीचे स्वरुप
जिरायती- 10 हजार रुपये प्रति हेक्टर
बागायती- 15 हजार रुपये प्रति हेक्टर
बहुवार्षिक पिक- 25 हजार रुपये प्रति हेक्टर
मदत मर्यादा- 2 हेक्टर
ट्विट
राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झाले. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना १० हजार कोटींचे अर्थसहाय्य आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केले.#MahaCabinetDecision
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 13, 2021
मुख्यमंत्री कार्यालयाने ट्वटिरद्वारे दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, ''राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झाले. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना १० हजार कोटींचे अर्थसहाय्य आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केले''.