Maharashtra Lockdown: राज्यात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता येत्या 2-3 दिवसांत लॉकडाऊन संदर्भात निर्णय जाहीर केला जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र सध्या विकेंड लॉकडाऊन लागू केला असला तरीही व्यापाऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. अशातच आता पुणे येथील व्यापाऱ्यांनी ठाकरे सरकारला अल्टिमेटम दिला आहे. त्यानुसार सरकारने लवकरच लॉकडाऊन संदर्भातील निर्णय जाहीर करावा अन्यथा आम्ही दुकाने उघडू असा इशारा दिला आहे.(पुण्यात 6 हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध; जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची माहिती)
राज्यात पूर्णपणे लॉकडाऊन केला तर आम्ही पाठिंबा देऊ असे पुण्यातील व्यापाऱ्यांनी म्हटले आहे. परंतु संपूर्ण लॉकडाऊन नसल्यास आम्ही बुधवार पासून दुकाने सुरु करु असे ही व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. याबद्दल व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी म्हटले आहे. दरम्यान, पुण्यात गेल्या आठवड्यातच विकेंड लॉकडाऊनला विरोध केला होता. त्यावेळी सुद्धा दुकानदारांनी आम्ही दुकाने सुरु करु असे जाहीर केले होते. मात्र दुकाने सुरु केल्यास त्यांच्या विरोधात कारवाई करु असा इशारा आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला होता.
पुणे जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पुरवठ्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहे. त्याचबरोबर या इंजेक्शनची गरज असलेल्या लोकांना टोल फ्री क्रमांक 020-26123371 किंवा 1077 वर संपर्क करण्यास सांगितले आहे. हे कंट्रोल रुम येत्या 31 मे पर्यंत कार्यरत असणार आहे. (Coronavirus: येत्यात 2-3 दिवसांत राज्य सरकार लॉकडाऊनबाबत महत्त्वाचा निर्णय घेणार- अस्लम शेख)
तर महाराष्ट्रात 51,751 कोरोना विषाणू रुग्णांची नोंद झाली आहे व 52,312 रुग्ण झाले बरे झाले आहेत. तसेच 258 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण रुग्णसंख्या 34,58,996 झाली आहे. राज्यात आतापर्यंत 28,34,473 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात 58,245 रुग्णांचा मृत्यू झाला आहेत व सध्या राज्यात 5,64,746 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.