Maharashtra Lockdown: महाराष्ट्रात कोरोनामुळे पुन्हा चिंता वाढली, सातारामध्ये लॉकडाउन-जाणून घ्या अन्य जिल्हातील परिस्थिती
लॉकडाउन (Photo Credits-PTI)

Maharashtra Lockdown:  महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. कारण कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्र सरकारने शनिवारी साताऱ्यामध्ये पुढील 8 दिवसांसाठी पूर्ण लॉकडाउन जाहीर केला आहे. अधिकृत आदेशानुसार, जिल्ह्यात चौथ्या टप्प्यातील निर्बंध लावण्यात आले आहेत. फक्त अत्यावश्यक सेवासुविधांमधील नागरिकांना सूट दिली गेली आहे. अन्य सर्व गोष्टी पुढील आठ दिवस पूर्णपणे बंद राहणार आहेत. आवश्यक वस्तूसंबंधित दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंतच सुरु ठेवता येणार आहेत.

अधिकृत आदेशानुसार, निर्बंध सोमवार ते शुक्रवार दरम्यान लागू असणार आहेत. तर विकेंड (शनिवार-रविवारी) संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी असणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली. कोल्हापूर, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोविड19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विकेंडला लॉकडाउन असणार आहे.(Mumbai: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 14 लाख नागरिकांवर सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्याने कारवाई)

या व्यतिरिक्त शनिवार पासून बहुतांश शहरांमध्ये विकेंड लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. याच दरम्यान, महाराष्ट्र सरकारने आदेशात असे म्हटले की, मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पिंपरी-चिंचवड, नाशिक, वसई-विरार आणि अन्य महापालिका क्षेत्रात कठोर लॉकडाउनचे निर्बंध लागू केले जाणार आहेत.(नागपूर येथे चार दिवसानंतर लसीकरण केंद्रावर लस दिली जात असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी)

महाराष्ट्र देश अशा राज्यांमध्ये सहभागी आहे जेथे दररोज कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत आहे. शनिवारी राज्यात कोरोनाचे 9489 रुग्ण आढळले असून 153 जणांचा बळी गेला आहे. महाराष्ट्रात सध्या 1,17,575 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

तसेच देशात गेल्या 24 तासात 43,071 नवे रुग्ण आढळले असून 955 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अॅक्टिव रुग्णांचा आकडा कमी होत 4,85,350 वर पोहचला आहे. जो एकूण रुग्णांच्या 1.59 टक्के आहे.