महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या पदवीधर (Graduate) आणि शिक्षक मतदार संघांच्या (Teacher Legislative Council Elections ) 5 जागांवर होणार्या निवडणूकीसाठी आता सार्याच पक्षांनी कंबर कसायला सुरूवात केली आहे. दरम्यान ही निवडणूक महाविकास आघाडी विरूद्ध भाजपा अशी होण्याची शक्यता आहे. 1 डिसेंबरच्या या निवडणूकीसाठी आज (9 नोव्हेंबर) भारतीय जनता पक्षाने आपले 4 उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाने जाहीर केलेल्या यादीनुसार, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर पुणे पदवीधरसाठी संग्राम देशमुख, नागपूरचे महापौर संदीप जोशी आणि अमरावती शिक्षक मतदारसंघ साठी नितीन धांडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. Postal Voting For Graduate Constituency Election: जेष्ठ नागरिक, दिव्यांगांना मिळणार टपाली मतांचा अधिकार, पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत निवडणूक आयोगाची अधिसूचना.
दरम्यान भाजपाने यादी जाहीर केली तरीही अद्याप महाविकास आघाडीमध्ये कोण कुठल्या जागेवरून लढणार आणि कुणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा अजून सुरू आहे. 12 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारांना आपला अर्ज दाखल करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे.
ANI Tweet
Bharatiya Janata Party releases names of candidates for biennial elections in Uttar Pradesh Legislative Council & Maharashtra Legislative Council pic.twitter.com/lmMfsXPCtE
— ANI (@ANI) November 9, 2020
- औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ - शिरीष बोराळकर
- पुणे पदवीधर मतदारसंघ - संग्राम देशमुख
- नागपूर पदवीधर मतदारसंघ - संदीप जोशी
- अमरावती शिक्षक मतदारसंघ - नितीन धांडे
नागपूर हा भाजपाचा बालेकिल्ला समजला जातो तेथून यंदा विद्यमान महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी झाली आहे. तर पुण्यामध्येही चुरस बघायला मिळणार आहे.पुणे पदवीधर मतदार संघातून भाजपा प्रमाणेच आप आणि मनसे देखील निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. महाविकासात ही जागा कॉंग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. Bigg Boss Marathi फेम अभिजित बिचुकले वरळीतून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात लढले, पडले; आता त्यांनी पुणे पदवीधर मतदारसंघातून लढायचे ठरवले.
दरम्यान महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील ही 5 जागांसाठी होणारी निवडणूक 1 डिसेंबरला सकाळी 8 ते सायंकाळी 5 दरम्यान मतदान करून होणार आहे. तर निकाल 3 डिसेंबरला जाहीर केला जाईल.