राजकिशोर उर्फ पापा मोदी (Photo Credits-Facebook)

महाराष्ट्रात येत्या 21 मे रोजी विधान परिषद निवडणूक पार पडणार आहे. तत्पूर्वी आज विधान परिषदेचा तिढा सोडवण्यासाठी आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रावादी काँग्रेस पक्षातील नेत्यांनी उपस्थिती लावली होती. आता ही बैठक संपली असून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी एका मोठ्या निर्णयाची घोषणा केली आहे. बाळासाहेब थोरात यांनी असे म्हटले आहे की,  महाविकासआघाडी विधान परिषदेच्या पाच जागा लढणार आहेत. परिणामी ही निवडणूक आता बिनविरोध होणार आहे. तसेच काँग्रेस पक्ष त्यांनी विधान परिषदेसाठी रिंगणात उतरवलेल्या एका उमेदवाराला मागे घेणार असल्याचे ही थोरात स्पष्ट केले आहे.

काँग्रेस पक्षाने विधान परिषदेसाठी राजेश राठोड आणि राजकिशोर उर्फ पापा मोदी यांना उमेदवारी जाहीर केली होती. परंतु काँग्रेस पक्षाच्या या भुमिकेवर उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच काँग्रेसने जर उमेदवार मागे घेतला नाही तर निवडणूक लढणार नाही असा निरोप सुद्धा बाळासाहेब थोरात यांना उद्धव ठाकरे यांनी पाठवला होता. परंतु आता बाळासाहेब थोरात यांनी आता एक उमेदवार मागे घेणार असल्याचे म्हटले आहे. परंतु काँग्रेसकडून उर्फ पापा मोदी यांना रिंगणातून बाहेर काढण्यात येणार पाहणे महत्वाचे ठरणार आहे.(शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेस तर राजेश राठोड, राजकिशोर उर्फ पापा मोदी काँग्रेसतर्फे विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात)

Tweet:

दरम्यान, उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद अबाधित ठेवण्यासाठी या निवडणूकीला सर्वाधिक महत्व आहे. 2019 मध्ये 29 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यात त्यांना विधिमंडळामध्ये निवडून येणे गरजेचे होते अन्यथा त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल. अशावेळेस राज्य मंत्रिमंडळाकडून दोनदा विधानपरिषदेवर राज्यपाल कोट्यातून उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कोमोर्तब करून त्यांना नियुक्ती व्हावी असा प्रस्ताव देण्यात आला होता. सध्या महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने निवडणूकीच्या वेळी मार्गदर्शक सुचनांची नियमावली जाहीर करण्यात आली आहे.