Maharashtra Legislature | (File Photo)

विधान परिषदेच्या रिक्त एकूण 11 जागांसाठी सुरु झालेल्या निवडणूक (Maharashtra Legislative Council Election) प्रक्रियेनुसार आज (12 जुलै) मतदान सकाळी 9.00 ते 4.00 या वेळेत पार पडत आहे. सर्वराजकीय पक्षांकडे असलेल्या मतांची गोळाबेरीज पाहिली तर आपापले उमेदवार सभागृहात आमदार म्हणून पाठविण्यासाठी पुरेसे मतदान आहे. मात्र, 11 जागा असताना 12 उमेदवार रिंगणात उतरल्याने उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे कोण निवडून येते याहीपेक्षा कोणता उमेदवार पराभूत होतो याचीच अधिक चर्चा सुरु आहे. कोणताही दगाफटका होऊ नये, कोणत्याच आमदाराचे मत वाया जाऊ नये, यासाठी सर्व राजकीय पक्ष आपापल्या पातळीवर प्रयत्न करत आहेत. त्याला किती यश येणार हे निकालानंतरच समजणार आहे.

महाविकासआघाडीची संयुक्त बैठक

विधान परिषद निवडणुकीसाठी मतदानाच्या आदल्या रात्री जोरदार खलबतं झाली. महाविकासआघाडीने आपपल्या नेत्यांची एक संयुक्त बैठक घेतली. या बैठकीस, काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चैनीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. शिवसेना (UBT) पक्षाकडून उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकर, अनिल परब, अनिल देसाई, विनायक राऊत तर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या सर्वांनी काँग्रेस आमदारांना मार्गदर्शन केले. (हेही वाचा, Vasant More Joins Shiv Sena (UBT): वसंत मोरे यांना उद्धव ठाकरे यांनी सुनावली शिक्षा; 'मातोश्री'वरील पक्षप्रवेश चर्चेत)

काल रात्री उशीरा (11 जून) काँग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक झाली. या बैठकीत महाविकास आघाडी प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन केले. काँग्रेसकडून रमेश चैनीथला, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण हे उपस्थित होते. तर ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकर, अनिल परब, अनिल देसाई, विनायक राऊत महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार गट) जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी काँग्रेसच्या आमदारांना मार्गदर्शन केले.

भाजपकडून मॉक पोलींग

दरम्यान, कोणत्याही परिस्थितीमध्ये आमदारांनी मतदान व्यवस्थित करावे. एकही मत बाद होऊ नये यासाठी भाजपने एकाच रात्रीत दोन वेळा मतदानासाठी मॉक पोलींग घेतले. तसेच, ही निवडणूक हलक्यात घेऊ नका. निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे कोणताही दगाफटका चालणार नाही, अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित भाजप आमदारांना दिल्या.

दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही आपापल्या आमदारांना सुरक्षीत ठिकाणी ठेवेले आहे. आमचेच सर्व उमेदवार निवडूण येणार असा दावा महाविकासआघाडी आणि महायुतीच्या नेत्यांकडून केला जातो आहे.