श्रीमंत गेले फार्महाऊसवर, मात्र, गरिबांच्या घरात जागा नसल्यामुळे ते बाहेर येऊन बसतात- जितेंद्र आव्हाड
Jitendra Awhad (PC- Twitter)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण देशात थैमान घातला आहे. कोरोना विषाणूची लागण होऊन आतापर्यंत हजारो लोकांनी आपली जीव गमावला आहे. तर, लाखो लोक कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकले आहेत. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. यातच खबरदारीचा उपाय म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात संचारबंदीची (Lockdown) घोषणा केली होती. मात्र, सरकारच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे दिसत आहे. यावर महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत लोक आपपल्या फार्महाऊसवर निघून गेले आहेत. मात्र, संपूर्ण देशात संचारबंदी असतानाही काही लोक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. कारण, गरिबांच्या घरात जागा बसायला जागा नाही. त्यामुळे ते रस्त्यावर कुठल्यातरी कोपऱ्यावर येऊन बसतात, असे आव्हाड म्हणाले आहेत.

भारतात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. यामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाली आहे. चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने 170हून अधिक देशांच्या नाकी नऊ आले आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, काही लोक रस्त्यावर फिरत आहेत, असे अनेकजण बोलत आहेत. अशा लोकांना आव्हाड यांनी खडेबोल सुनावले आहेत. एका वृत्त वाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, "सामाजिक जाणीव नसलेली लोके गरिबांना दोष देत आहेत. माझे तर स्पष्ट मत आहे, हा रेशन कार्डवाल्यांचा दोष नव्हता. हा पासपोर्टवाल्यांचा दोष होता. हा भारतात उत्पादित झालेला रोग नाही, बाहेरुन आलेला रोग आहे. कोण कुठे गेले होते, त्याच्याशी मला काही घेणेदेणे नाही. तुम्हाला दक्षिण मुंबईत गर्दी दिसणार नाही. कारण सगळे फार्महाऊसवर निघून गेले आहेत. मात्र गरिबांना घरात बसायला जागा नाही. त्यामुळे ते रस्त्याच्या कुठल्यातरी कोपऱ्यावर येऊन बसतात", असेही आव्हाड म्हणाले आहेत. हे देखील वाचा- लज्जास्पद! कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर येथे जंतुनाशक औषधांची फवारणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना नागरिकांकडून मारहाण

कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु असतानाही रुग्णांच्या संख्येत सकारात्मक बदल झाला नाही. महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. यातच महाराष्ट्रात आणखी 3 नवे रुग्ण आढळल्याचे समजत आहे. दरम्यान, बुलढाण्यात एक तर, पुणे येथे 2 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.