दिल्लीच्या सीमेवर मागील 70 दिवसांपेक्षा अधिक काळ आंदोलन करत असलेल्या शेतकर्यांकडे आता जगाचं लक्ष लागलं आहे. काही दिवसांपूर्वी या आंदोलनाबाबत माजी पॉर्न स्टार मिया खलिफा(Mia Khalifa), आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना (Rihanna) यांनी ट्वीट करत जगाचं लक्ष वेधलं. मात्र आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी यामध्ये उतरल्यानंतर देशाची सार्वभौमत्त्वाची बाजू पुढे करत भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar), सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्यासह अक्षय कुमार (Akshay Kumar), सायना नेहवाल पर्यंत अनेक सेलिब्रिटी आणि खेळाडू यांनी ट्वीट केली आहेत. या ट्वीट्समध्ये साधर्म्य असल्याने आता महाराष्ट्र कॉंग्रेस नेत्यांनी ही बाब ठाकरे सरकारच्या लक्षात आणून देत त्याबाबत तपास व्हावा अशी मागणी केली आहे. दरम्यान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी देखील त्याला उचलून धरत सेलिब्रिटी ट्वीट्सच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान हा तपास राज्याच्या गुप्तहेर विभागाकडून केला जाणार आहे. आपलं क्षेत्र सोडून इतर गोष्टी बोलताना काळजी घ्यावी, शरद पवारांचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला सल्ला.
सध्या राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख कोरोना विरूद्द लढाईत उपचार घेत आहेत. मात्र त्यांनी कॉंग्रेस नेते सचिन सावंत आणि अन्य लोकांसोबत झूम कॉलच्या माध्यमातून चर्चा करत आपली मतं मांडली आहेत. सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, विराट कोहली सह सेलिब्रिटींनी केलेल्या ट्वीट मागे मोदी सरकारचा दबाव होता का? याचा तपास केला जाणार आहे. प्रामुख्याने काही शब्द सारखे आहेत. तसेच उल्लेखनीय बाब म्हणजे अभिनेता अक्षय कुमार आणि सायना नेहवाल यांचं ट्वीट अगदी सारखंच आहे. त्यामुळे सेलिब्रिटींच्या ट्वीट मधील साधर्म्यामुळे त्यांची ही खरंच वैयक्तिक भूमिका आहे की सरकारचा दबाव असा प्रश्न अनेकांच्या मनात रेंगाळत आहे.
कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांची प्रतिक्रिया
#WATCH | There was series of tweets after MEA's response to Rihanna's tweet. If a person opines on their own, it's fine but there's scope of suspicion that BJP could be behind this...Spoke to HM Deshmukh. He has given orders to Intelligence dept to probe: Congress' Sachin Sawant pic.twitter.com/kutYYJjxqG
— ANI (@ANI) February 8, 2021
दरम्यान एबीपी माझा सोबत बोलताना शिवसेना मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी याबद्दल बोलताना सेलिब्रिटी ट्वीट प्रकरणाला इतकं महत्त्व देण्याची गरज नसल्याची भूमिका मांडली आहे. सेलिब्रिटींनी जशी ही केंद्र सरकारच्या समर्थनार्थ ट्वीटची मालिका सुरू केली तशी नेटकर्यांनी तात्काळ त्यांच्या ट्रोलिंगला देखील सुरूवात केली होती. काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये याबाबत बोलताना मोदी सरकारने किमान भारतरत्नांच्या सन्मानाचा विचार करायला हवा होता. यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याचं बोलत मोदी सरकारचा निषेध केला होता.