Maharashtra: अनैतिक संबंधाला मान्यता देण्यासाठी बायकोचा दबाव, मानसिक तणावामुळे नवऱ्याने केली आत्महत्या
फोटो सौजन्य- फाइल इमेज

Maharashtra: मुंबईतील टिटवाळा येथे एका डॉक्टरच्या आत्महत्येमागील गुढ उकलण्यास पोलिसांना यश आले आहे. डॉक्टर अविनाश देशमुख असे मृत व्यक्तीचे नाव असून त्याने 12 नोव्हेंबरला आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. टिटवाळा पोलिसांनी आत्महत्येनंतर याचा अधिक तपास सुरु केला. तपासादरम्यान धक्कादायक कारण समोर आले. त्यांनी असे सांगितले की, डॉक्टरची पत्नी आणि तिची आई त्याच्यावर विवाहबाह्य आणि अनैतिक संबंधाला मान्यता द्यावी. पत्नी स्वत: सुद्धा पेशाने डॉक्टरच आहे.

अविनाश देशमुख हे आपली पत्नी आणि दोन मुलांसोबत राहत होते. नारायण रोडच्या मोहन हाइट्स बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या अविनाश यांचे इंदिरा नगर परिसरात एक क्लिनिक सुद्धा आहे. येथे येऊन ते आपल्या डॉक्टर पदाची प्रॅक्टिस करायचे. परंतु त्यांची पत्नी शुभांगी हिचे तिच्या मामाच्या भावासोबत लैंगिक संबंध होते. याबद्दल अविनाश याला कळले.(Pune Crime: निगडीमध्ये सोनसाखळी चोराचा पोलिसावर हल्ला, आरोपीस अटक)

शुभांगी ही अविनाश याच्यावर तिच्या अनैतिक संबंधाला मान्यता द्यावी यासाठी दबाव टाकत होती. परंतु यामध्ये अविनाश याची सासु सुद्ध आपल्या मुलीच्या या प्रकारात तिला साथ देत होती. त्याचसोबत बायकोच्या या अनैतिक संबंधाबद्दल अविनाश याने अधिक विचार करु नये असे ही सासु त्याला सांगत होती.

या व्यतिरिक्त बायको ही अविनाश याच्या आई-वडिलांसोबत सुद्धा राहण्यास तयार नव्हती. त्यामुळे वेगळे घर घेऊन राहण्याची मागणी सुद्धा तिने केली होती. या सर्व गोष्टींमुळे अविनाश खुप तणावात होता. अखेर या सगळ्या गोष्टींना कंटाळून त्याने गळफास लावत आपले आयुष्य संपवले.

अविनाश याने आत्महत्या करण्यापूर्वी शुभांगी हिला आपला निर्णय सांगितला. तेव्हा ती आपल्या माहेरी साताऱ्याला गेली होती. शुभांगीने याबद्दल तिच्या सासु-सासऱ्यांना सांगितले. तो पर्यंत उशिर झाला होता आणि अविनाश याच्या आई-वडिलांना त्याला आत्महत्या करण्यापासून थांबवता आले नाही. टिटवाळा पोलिसांनी या घटने प्रकरणी अविनाश याची सासु संगीता, पत्नी शुभांगी यांच्या विरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचसोबत आयपीसी कलम 302 सुद्धा लावण्यात आला आहे.