राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या कार्यकर्त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्याने आव्हाडांनी गेल्या काही दिवसांपासून क्वारंटाईन करुन घेतले होते. मात्र त्यांना काल रात्री ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र घाबरण्याचे काही कारण नसून खबरदारी म्हणून तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे PTI ने वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना झाल्याचे काही वृत्तवाहिन्यांनी दाखविल्यानंतर आव्हाडांनी आपला कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट सोशल मिडियावर पोस्ट या खोट्या बातम्यांना पूर्णविराम दिला होता.
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ही चाचणी निगेटिव्ह आली होती. तसेच त्यांनी स्वत:ला काही दिवसांपासून क्वारंटाईन देखील केले होते. मात्र त्यांना काल रात्री पुन्हा एकदा जवळील रुग्णालयात दाखल केल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले. महाराष्ट्र गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केला त्यांचा Covid 19 Test निगेटीव्ह असल्याचा रिपोर्ट; TRP साठी खोट्या बातम्या दाखवणार्यांना सुनावले खडे बोल!
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून त्यांचा रिपोर्ट शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह असल्याचं स्पष्ट दिसत आहे. 'माणुसकीचा धर्म राखत मी माझ्या सोबत असणार्यांचीही कोरोना चाचणी करून घेतली आहे. इतर किती जणांमध्ये ही जाणीव आहे?' असा खुला सवाल देखील त्यांनी विरोधक आणि खोट्या बातम्या पसरवणार्यांना विचारला आहे.
ठाणे मध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्त्वाखाली गोर गरीबांना अन्न वाटप, खिचडी वाटपाचं काम नियमित सुरू आहे. त्यामुळे एनसीपी नेते, कार्यकर्ते यांची वर्दळ सुरू असते. काल त्यांनी लिहलेल्या फेसबूक पोस्टमध्येही एनसीपी अध्यक्ष शरद पवारांसोबत बातचीत झाली असून त्यांनी तब्येतीची विचारपूस केली. आता घरीच राहून पुढील काही दिवस काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला असल्याची भावूक पोस्ट देखील जितेंद्र आव्हाडांनी केली आहे.