जितेंद्र आव्हाड (Photo Credits-Twitter)

महाराष्ट्र गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) कोरोनाबाधित पोलिस कर्मचार्‍याच्या संपर्कात आल्याने मागील काही दिवसांपासून क्वारंटीन आहेत. मात्र काही मीडिया रिपोर्ट्स आणि राजकीय मंडळींनी जितेंद्र आव्हाड कोरोना बाधित असल्याचं सांगितलं होतं. मात्र आज या सार्‍या वृत्तांना फेटाळत जितेंद्र आव्हाड यांनी आपला कोरोना चाचणी निगेटीव्ह असल्याचा रिपोर्ट शेअर केला आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून त्यांचा रिपोर्ट शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह असल्याचं स्पष्ट दिसत आहे. 'माणुसकीचा धर्म राखत मी माझ्या सोबत असणार्‍यांचीही कोरोना चाचणी करून घेतली आहे. इतर किती जणांमध्ये ही जाणीव आहे?' असा खुला सवाल देखील त्यांनी विरोधक आणि खोट्या बातम्या पसरवणार्‍यांना विचारला आहे. शरद पवारांचा एक फोन आला आणि जादू झाली; Qurantaine मध्ये असणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांची भावुक पोस्ट.

दरम्यान जितेंद्र आव्हाड यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली असली तरीही प्रोटोकॉलनुसार ते 14 दिवस क्वारंटीन राहणार आहे. दरम्यान काल जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावरील सुमारे 14 जणांचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटीव्ह आला आहे. यामध्ये आव्हाडांच्या भेटीला आलेले माजी खासदार आनंद परांजपे यांचादेखील कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असून त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

जितेंद्र आव्हाड यांचा कोरोना रिपोर्ट

ठाणे मध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्त्वाखाली गोर गरीबांना अन्न वाटप, खिचडी वाटपाचं काम नियमित सुरू आहे. त्यामुळे एनसीपी नेते, कार्यकर्ते यांची वर्दळ सुरू असते. काल त्यांनी लिहलेल्या फेसबूक पोस्टमध्येही एनसीपी अध्यक्ष शरद पवारांसोबत बातचीत झाली असून त्यांनी तब्येतीची विचारपूस केली. आता घरीच राहून पुढील काही दिवस काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला असल्याची भावूक पोस्ट देखील जितेंद्र आव्हाडांनी केली आहे.