महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा विळखा दिवसागणिक वाढत आहे. दरम्यान मंगळवार (14 एप्रिल) च्या रात्री एनसीपी नेते आणि माजी खासदार यांच्यासह अन्य 6 जणांचे कोरोना रिपोर्ट्स पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घरी त्यांचं येणं-जाणं होतं. मागील एक - दोन भेटींमध्ये त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अंदाज आहे. काल (14 एप्रिल) जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावरील सुमारे 14 जणांचा कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. Coronavirus: जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यामध्ये काम करणाऱ्या 16 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण.
HT च्या वृत्तानुसार, ठाणे महानगर पालिकेचे डेप्युटी म्युनिसिपल कमिशनर संदीप माळवी यांनी बुधवारी सहा जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट केलं आहे. यामध्ये या एनसीपी नेत्याचादेखील कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचं म्हटलं आहे. सध्या त्यांच्या निकटवर्तीयांचाही शोध सुरू आहे. ठाण्यातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये या नेत्यावर उपचार सुरू असून त्यांना कोणतीही लक्षणं नसल्याचं सांगण्यात आलं आहे. आता त्यांचे कुटुंबीयही क्वारंटीन असून त्यांच्या चाचण्या घेण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. शरद पवारांचा एक फोन आला आणि जादू झाली; Qurantaine मध्ये असणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांची भावुक पोस्ट.
ठाणे मध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्त्वाखाली गोर गरीबांना अन्न वाटप, खिचडी वाटपाचं काम नियमित सुरू आहे. त्यामुळे एनसीपी नेते, कार्यकर्ते यांची वर्दळ सुरू असते. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी देखील स्वतःला क्वारंटीन करून घेतले असून काही दिवसांपूर्वी त्यांची करण्यात आलेली कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. काल त्यांनी लिहलेल्या फेसबूक पोस्टमध्येही एनसीपी अध्यक्ष शरद पवारांसोबत बातचीत झाली असून आता घरीच राहून पुढील काही दिवस काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला असल्याचं जितेंद्र आव्हाडांनी लिहलं आहे.
महाराष्ट्रामध्ये 14 एप्रिलच्या रात्री पर्यंत एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2684 पर्यंत पोहचला असून ठाणे जिल्ह्यामध्ये 270 कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी 259 जणांवर उपचार सुरू असून 10 जणांचा मृत्यू तर एक जण कोरोनामुक्त झाला आहे.