Anil Deshmukh (Photo Credit: Twitter)

संजय राठोड यांच्या पाठोपाठ आज महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार मधील दुसरे मंत्रील अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान काही वेळापूर्वीच त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केला आहे. आज सकाळी बॉम्बे हाय कोर्टाने अनिल देशमुख यांच्यावरील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 15 दिवसांत ही चौकशी करून काही चूक आढळल्यास एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. HM Anil Deshmukh यांची 100 कोटींच्या वसुली आदेश प्रकरणी CBI चौकशी करण्याचे Bombay High Court चे आदेश; Dr Jaishri Patil यांची Writ Petition मान्य

दरम्यान सीबीआय चौकशीचे आदेश असताना पदावर राहणं उचित नसल्याचं सांगत देशमुखांनी राजीनामा देण्याची इच्छा शरद पवार यांच्याकडे व्यक्त केली आणि त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिल्याचं एनसीपी प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. हा राजीनामा उद्धव ठाकरे स्वीकरतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Anil Deshmukh Resignation

मागील काही दिवसांपासून सचिन वाझे प्रकरण, परमबीर सिंह लेटर बॉम्ब यांच्यामुळे राज्यात राजकीय शिमगा सुरू होता. विरोधकांनी आक्रमक होत यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मनसुख हिरेन आणि सचिन वाझे प्रकरणावरून गृहमंत्र्यांवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर गृहमंत्र्यांनी परमबीर सिंहावर अक्षम्य चूका झाल्याने बदली केल्याचं वक्तव्य केल्यानंतर त्यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत देशमुखांनी अचिन वाझेला 100 कोटीच्या वसुलीचे आदेश दिल्याचा खळबळजनक आरोप केला. यानंतर सुरूवातीला सर्वोच्च न्यायालय आणि नंतर उच्च न्यायालयात सिंह यांनी सीबीआय चौकशी साठी याचिका दाखल केली. सिंह यांची याचिका फेटाळली गेली असली तरीही आज Dr Jaishri Patil यांची Writ Petition मान्य करत सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत.