Maharashtra Home Minister Anil Deshmukh On Kangna Ranaut: कंगना रनौत ला मुंबई, महाराष्ट्रात सुरक्षित वाटत नसेल तर इथे राहण्याचा अधिकार नाही : गृहमंत्री अनिल देशमुखांची प्रतिक्रिया
Anil Deshmukh | Photo Credits: Facebook

मुंबई मध्ये राहणं सुरक्षित वाटत नसल्याचे सांगत बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने (Kangna Ranaut) थेट पाकिस्तान व्याप्त कश्मीर (POK) सोबत शहराची तुलना केल्याने सध्या सोशल मीडियामध्ये आणि समाजातही तिच्या वक्तव्याचा अनेकांनी निषेध केला आहे. आज महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Maharashtra Home Minister Anil Deshmukh) यांनी देखील मुंबई पोलिस (Mumbai Police)  दलाची पाठराखण करत ज्यांना मुंबईमध्ये राहणं सुरक्षित वाटत नाही त्यांना मुंबई, महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नसल्याचं सांगत ठणकावलं आहे.

कोरोना संकट काळात मुंबई पोलिस, महाराष्ट्र पोलिस जीवाची बाजी लावून काम करत आहेत. ज्यांच्या कार्याला गौरव स्कॉटलंड यार्ड पोलिसांसोबत तुलना करून केला जातो. त्यांच्याबद्दल बेजाबबदारपणे बोलणं हे चूकीचं असल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. दरम्यान एकूणच सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन केली जात आहे. त्यासाठी निवृत्त पोलिस अधिकारी न्यायालयामध्ये पोहचले आहेत. Sushant Singh Rajput Case मध्ये ज्या पद्धतीने मुंबई पोलिसांना लक्ष्य केलं जातंय ते पाहता निवृत्त IPS Officers च्या बॉम्बे हाय कोर्टातील याचिकेचं स्वागत करतो - गृहमंत्री अनिल देशमुख.  

अनिल देशमुख यांचं वक्तव्य

दरम्यान काल कंगना रनौतने ट्वीट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मला खुली धमकी दिली आहे की मुंबईमध्ये येऊ नकोस. मला मुंबई शहर पाकव्याप्त कश्मिर सारखं का वाटतयं? असा सवाल विचारला होता. कंगनाच्या या वक्तव्याच्या बॉलिवूड आणि मराठी कलाकारांनी खरपूस समाचार घेतला आहे.  Shiv Sena MP Sanjay Raut On Kangna Ranaut: कंगना रनौत ला पाठिंबा देऊन मुंबई आणि मुंबई पोलिस दलाची प्रतिमा करण्याचा राजकीय प्रयत्न; संजय राऊत यांची प्रतिक्रिया

काही दिवसांपूर्वी कंगनाने मला बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची भीती वाटतेय. केंद्राने किंवा हिमाचल सरकारने मला सुरक्षा द्यावी असं देखील म्हटलं होतं. दरम्यान आताही कंगनाने मी 9 सप्टेंबरला मुंबईमध्ये येतेय, कुणाच्या बापाची हिंमत असेल तर मला अडवून दाखवा अशी प्रतिक्रिया समोर आली आहे. ट्वीटरवरही तिच्यावर टीका करणार्‍यांना तिने प्रत्युत्तरं दिली आहेत.