
कोरोनाचा धोका लक्षात घेता महाराष्ट्रात (Maharashtra) महापालिका क्षेत्रांत येत्या 5 जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यात पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवीन वर्षाच्या स्वागतासाठी महत्वाच्या गाइडलाइन्स (Guidelines For New Year) जारी केल्या आहेत. यात नागरिकांना अनेक सूचना करण्यात आल्या आहेत. अन्य सण व उत्सवांप्रमाणे नववर्षाचे स्वागतही यंदा साधेपणाने केले जावे. दरम्यान, कुठेही गर्दी करून सोशल डिस्टन्सिंगचा नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठीच या विशेष गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत.
संपूर्ण देशात नव्या वर्षाचे मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषात साजरा केला जातो. मात्र, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यात नव्या कोरोना विषाणूचा वाढलेला धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने नववर्षाच्या निमित्ताने महत्वाच्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. राज्यातील नागरिकांनी 31 डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षाचे स्वागत करणाच्या निमित्ताने घरा बाहेर पडू नये. राज्यात अद्यपही कोरोनाचे संकट टळलेले नसून नववर्षाचे स्वागच घरीच साधेपणाने साजरे करावे, असे राज्य सरकारने जारी केलेल्या गाइडलाइन्समध्ये नमूद करण्यात आले आहे. हे देखील वाचा Mumbai: थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांवर आठ ड्रोन, 40 हजार पोलीस ठेवणार करडी नजर
कोरोना विषाणूने महाराष्ट्रसह संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक धार्मिक, समाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम रद्द किंवा लॉकडाऊनच्या निर्बंधांखाली साजरी करावी लागली आहेत. तसचे 2020 हे वर्षात अनेकांना बऱ्याच अडचणींना सामोर जावा लागले आहे. यामुळे यंदा नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात साजरा करणाऱ्याची ईच्छा ठेवणाऱ्या नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी थर्टी फर्स्ट साजरी करावी असे म्हटले पण नागरिकांना गर्दी करु नये, अशा सूचना ही दिल्या आहेत. त्याचसोबत 11 वाजेपर्यंतच थर्टी फर्स्ट साजरी करण्यास परवानगी दिली गेली आहे. इमारतीच्या गच्चीवर सुद्धा जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांच्या दोन शिफ्ट लावल्या जाणार असून प्रत्येक शिफ्टमध्ये 20 हजार पोलीस कार्यरत असतील. हे पोलीस कोरोनाच्या नियमांचे पालन होते की नाही यावर लक्ष ठेवणार आहेत.