Chief Minister Uddhav Thackeray (PC - Twitter)

महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहे. राज्यात गेल्या आठवड्याभरात जवळपास एक लाख कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढणारी चिंताजनक आहे. याचपार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने नव्या गाइडलाईन्स (Maharashtra Government New Guidelines) जारी केल्या आहेत. या नव्या गाईडलाईन्समध्ये राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि चित्रपटगृह 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन सारखे वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या नव्या गाइडलाईन्सनुसार, राज्यात राजकी, सामाजिक आणि धार्मिक मेळाव्यास परवानगी नाही. तसेच लग्न संमारंभात केवळ 50 जणांनाच उपस्थित राहता येणार आहे. याचबरोबर अंत्यसंस्कारांसाठी 20 फक्त व्यक्तींनाच केवळ परवानगी देण्यात आली आहे. या निर्बंधांचे पालन न झाल्यास संबंधितांवर फौजदारी करण्यात येणार आहे. तसेच मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग न पाळल्यास थेट दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात म्हटले आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्रातील Lockdown बाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची महत्वाची माहिती; म्हणाले- 'वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय...'

ट्वीट-

राज्यात आज 15 हजार 051 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 10 हजार 671 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 21 लाख 44 हजार 743 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 1 लाख 3 हजार 547 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.07% झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.